शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

भाजपाचे पुन्हा अमराठी कार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 6:25 AM

मीरा भार्इंदर महापालिका निवडणुकीसाठी सर्वात जास्त म्हणजे ६४ मराठी उमेदवार शिवसेनेने दिले आहेत. त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसने ४४ उमेदवार दिले आहेत.

धीरज परब मीरा रोड : मीरा भार्इंदर महापालिका निवडणुकीसाठी सर्वात जास्त म्हणजे ६४ मराठी उमेदवार शिवसेनेने दिले आहेत. त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसने ४४ उमेदवार दिले आहेत. भाजपाने मराठी उमेदवारांऐवजी अमराठी उमेदवारांना प्राधान्य दिले असून ५० अमराठी, तर ४३ मराठी उमेदवारांना तिकीटे दिली आहेत.मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी घराणेशाही, जातीधर्माच्या उमेदवार न देता त्याचे चारित्र्य, शिक्षणाच्या आधारे तिकीटवाटप करू असे जाहीर केले होते. पण प्रत्यक्षात त्या साºयांपेक्षा निवडून येण्याचा निकष महत्तवाचा ठरला आहे.मीरा-भार्इंदरच्या ९५ जागांसाठी २० आॅगस्टला मतदान होणार आहे. त्यात पाच लाख ९३ हजार ३३५ मतदार असून त्यात तीन लाख २१ हजार ७७० पुरुष, तर दोन लाख ७१ हजार ५४८ महिला मतदार आहेत; तर अन्य १७ जण आहेत.मीरा-भार्इंदर हे तसे विविध धर्म, जात, प्रांताचे शहर म्हणून ओळखले जाते. येथे मराठी मतदारांसह गुजराती, राजस्थानी व जैन तसेच ख्रिश्चन, मुस्लिम आणि उत्तर भारतीय मतदारांची संख्याही मोठी-निर्णायक आहे. मराठी मतदारांकडूनही मराठी भाषक उमेदवारच हवा, असा आग्रह धरला जात नाही. कारण हा मतदारही विभागलेला आहे. अन्य धर्म, प्रांत किंवा जातीच्या मतदारांची संख्याही निर्णायक आहे.गुजराती, जैन, राजस्थानी, उत्तर भारतीय, ख्रिश्चन, मुस्लीम मतदार निर्णायक असलेल्या प्रभागांमध्ये सर्वच राजकीय पक्ष आणि नेते मतदारांना चुचकारण्यासाठी त्या त्या धर्म, जात, प्रांताचा उमेदवार देण्यासाठी पराकाष्ठा करतात. मनसेने निवडणुकीत २५ उमेदवार उभे केले आहेत. त्यात १८ मराठी उमेदवार आहेत. गुजराती-राजस्थानी चार, तर उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय व बंगाली असा प्रत्येकी एक उमेदवार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने ६७ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यात ४४ मराठी, ८ जैन, गुजराती व मारवाडी, १० मुस्लिम, प्रत्येकी ३ उत्तर भारतीय व ख्रिश्चन; तर दक्षिण भारतीय अणि बंगाली एक-एक उमेदवार दिले आहेत.बहुजन विकास आघाडीने २७ उमेदवारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. त्यात १५ मराठी, गुजराती, जैन, मारवाडी २; उत्तर भारतीय ४, मुस्लिम ५ व एका बंगाली उमेदवाराचा समावेश आहे.पालिकेत सत्तेत असलेल्या भाजपाने ९४ उमेदवार निवडणुकीसाठी उभे केले आहेत. परंतु प्रभाग २० मधून त्यांच्या नगरसेविका डॉ. नयना वसाणी यांनी गंभीर गुन्ह्याचे कलम तसेच शिक्षणाची माहिती लपवल्याने त्यांचा उमेदवारी अर्जच बाद झाला. त्यामुळे आता भाजपाचे ९३ उमेदवार रिंगणात आहेत.भाजपाने मराठीऐवजी अमराठी उमेदवारांना जास्त प्राधान्य दिले आहे. तब्बल ५० अमराठी उमेदवार देताना मराठी उमेदवार ४३ दिले आहेत. भाजपाने २७ जैन, राजस्थानी व गुजराती उमेदवार दिले आहेत. उत्तर भारतीय ८, मुस्लिम ५ तर ख्रिश्चन-दक्षिण भारतीय प्रत्येकी ३, तर अन्य ४ उमेदवार दिले आहेत.मीरा-भार्इंदरमध्ये भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांच्याकडे पक्षाची सूत्रे आल्यापासून त्यांनी अमराठी उमेदवारांना प्राधान्य दिले आहे. प्रभाग पाचमधून भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक शरद पाटील यांचा पत्ता कापून राकेश शहा यांना उमेदवारी दिली. रोहिणी संजय कदम यांना डावलून रक्षा भूपतानी यांना प्रभाग सातमधून तिकीट दिले. शिवसेनेतून आलेल्या प्रशांत दळवींना २० मधून उमेदवारी न देता प्रभाग १७ मध्ये पाठवले. सुधीर कांबळी यांच्या पत्नीला डावलून हेतल परमारना तिकीट दिले.प्रभाग २३ मधून शैलेष म्हामूणकर यांच्या पत्नी ऐवजी वर्षा भानुशाली यांना उमेदवारी दिली.मराठी इच्छुकांना दाखवला कात्रजचा घाटप्रभाग १४ मध्ये अनिल भोसलेंना घरचा रस्ता दाखवत मीरादेवी यादव यांना उभे केले. याशिवाय किरण चेऊलकर, किरण गेडाम, राजेंद्र मोरे, अजित पाटील आदी मराठी भाषक इच्छुकांना कात्रजचा घाट दाखवला. यामुळे मराठी भाषिक उमेदवारांनी बंडखोरी केली किंवा ते नाराज झाले.शिवसेनेने ९४ उमेदवारांपैकी तब्बल ६४ मराठी भाषक उमेदवार दिले आहेत. मराठी भाषकांमध्ये स्थानिक ख्रिश्चनांचाही देखील समावेश आहे. मराठी भाषकांना प्राधान्य देतानाच शिवसेनेने १२ उत्तर भारतीय, ८ जैन- गुजराती - मारवाडी, ७ मुस्लिम, २ दक्षिण भारतीय उमेदवार दिले.शिवसेनेच्या एका उत्तर भारतीय महिला उमेदवाराचा अर्ज बाद झाला.काँग्रेसचे माजी आमदार मुजफ्फर हुसेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे ७८ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यात ३५ मराठी भाषक आहेत. या शिवाय १५ उत्तर भारतीय, ११ जैन- गुजराती- मारवाडी, १० मुस्लिम, ४ ख्रिश्चन, २ दक्षिण भारतीय, तर एक बंगाली उमेदवार पक्षाने दिला आहे.मीरा-भार्इंदर हे विविध धर्म, जात, प्रांताचे शहर असून येथे मराठी मतदारांसह गुजराती, राजस्थानी व जैन तसेच ख्रिश्चन, मुस्लिम आणि उत्तर भारतीयांची संख्याही मोठी आहे.