सदानंद नाईक
उल्हासनगर : राष्ट्रवादी पक्षातील ओमी कलानी पलटण म्हणजे गुन्हेगारीची खाण असल्याचा आरोप भाजपाचे माजी नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी केल्याने, कलानी विरुद्ध भाजप असा सामना शहरात रंगला आहे. तडीपार, मोक्का, अपहरण, हाणामारी आदी गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांचा भरणा कलानी पलटण मध्ये असल्याने, ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरातील शांतता भंग पवनार असल्याची प्रतिक्रिया रामचंदानी यांनी दिली.
उल्हासनगर भाजपचे जिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, आमदार कुमार आयलानी व प्रदीप रामचंदानी यांनी गेल्या आठवड्यात ओमी कलानीसह त्यांच्या समर्थकावर टीका केली होती. आमदार आयलानी यांनी पोलीस ताब्यात असलेला गँगस्टर सुरेश पुजारी यांचा फँटर पंकज त्रिलोकांनी हा ओमी कलानी टीम मध्ये सक्रिय असल्याचा आरोप केला. तर ओमी कलानी यांनी जमनुदास रामचंदानी यांच्यावर टीका टिपण्णी करून वेळ आल्यानंतर जबाब देणार असल्याचे संकेत दिले. रामचंदानी यांनी पुन्हा ओमी कलानी यांच्यार टीका केली. राष्ट्रवादी पक्षाचे नेते ओमी कलानी यांनी भाजपचे आमदार आमदार कुमार आयलानी, जमनुदास पुरस्वानी यांच्यावर टीका करून त्यांना येणाऱ्या महापालिका निवडणुकीत दुहेरी संख्या गाठू न देण्याचा चँग बांधला. आरोप करणारे प्रदीप रामचंदानी यांनी महापालिकेची फाईल चोरली होती. तसेच तो प्रकार सिसिस्टीव्ह कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याने त्यांना जेल मध्ये जावे लागले होते.
रामचंदानी यांनी कलानी सोबत असलेल्या तरुणांची चौकशी झाल्यास, अनेक गुन्हेगार बाहेर येथील असेही रामचंदानी म्हणाले. एकूणच भाजप व ओमी कलानी समर्थक आमनेसामने आले असून ते एकमेकांचे वस्त्रहरण करीत आहेत.