मीरा रोड : दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या भाजपप्रणीत मीरा-भार्इंदर महापालिका श्रमिक सहकारी पतपेढीची मान्यता कोकण विभागीय सहनिबंधकांनी रद्द केल्याने सदर पतपेढीचा कारभार तातडीने बंद करण्याची मागणी मीरा-भार्इंदर महापालिका कर्मचारी सहकारी पतपेढीने केला आहे. या निर्णयामुळे सत्ताधारी भाजप तसेच पालिका प्रशासनास चपराक बसली आहे.
मीरा-भार्इंदर नगरपालिका काळात अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतपेढीची नोंदणी १९९५ साली झाली होती. तेव्हापासून सदर संस्था पालिका मुख्यालयात दिलेल्या कार्यालयात कार्यरत आहे. पालिकेचे १४७१ अधिकारी व कर्मचारी असून त्यातील ८६९ जण सहकारी पतपेढीचे सदस्य आहेत. पतपेढीची उलाढाल १४ कोटी ६२ लाख इतकी असून सदर संस्थेला सातत्याने ‘अ’ वर्ग मिळत आला आहे.पतसंस्थेवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपचे माजी आ. नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली श्रमिक कर्मचारी संघटनेमार्फत २०१६ मध्ये निवडणुकीत पॅनल उभे करण्यात आले. पतपेढीच्या इतिहासातील ती निवडणूक वादळी ठरली. मात्र, भाजपच्या पॅनलचा धुव्वा सहकारी पॅनलने उडवला. सहकारी पॅनलला शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, बविआ आदी सर्वच पक्ष संघटनांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर, मेहतांच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणीत मीरा-भार्इंदर महापालिका श्रमिक सहकारी पतपेढीची नोंदणी ३१ जानेवारी २०१७ रोजी करण्यात आली. ‘महापालिका’ या शब्दाचा वापर तसेच एक पतपेढी असताना दुसरी पतपेढी मंजूर केल्याने याविरोधात पालिका कर्मचारी सहकारी पतपेढीने तक्रारी केल्या होत्या. परंतु, पालिकेत भाजपची सत्ता असल्याने सदर पतपेढीसाठी पालिका आवारात झाडे तोडून बेकायदा कार्यालय बनवून दिले. सहकारी संस्था उपनिबंधक यांनी भाजपप्रणीत पतपेढीला नोंदणी प्रमाणपत्र दिले. याविरोधात कर्मचारी सहकारी पतपेढीने कोकण विभागीय सहनिबंधक यांच्याकडे दाद मागितली होती. त्याची सुनावणी झाल्यावर अलीकडेच ए.एल. घोलकर यांनी श्रमिक सहकारी पतपेढीची नोंदणीच रद्द केल्याचे आदेश दिले.कर्मचाºयांची आधीच पतसंस्था असताना त्यांची ना-हरकत न घेता तसेच पालिका आयुक्तांची ना-हरकत न घेता पतसंस्थेची उपनिबंधकांनी नोंदणी केली. २००८ च्या उच्च न्यायालयाच्या एका आदेशानुसार एक संस्था अस्तित्वात असताना नवीन संस्था नोंदणी करताना सर्वसाधारण व्यवहार्यता तपासणे गरजेचे आहे. सहकारी पतपेढीचे ८६९ सभासद असून उर्वरित ६०२ पैकी केवळ २५८ सभासद हे भाजपप्रणीत संस्थेचे सभासद आहेत. काही सभासदांना जबरदस्तीने सभासद करमन घेण्यात आल्याची तक्रार आहे. या नवीन संस्थेमुळे जुनी संस्था आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता आदेशात वर्तवली आहे.सहनिबंधकांनी या पतसंस्थेची नोंदणी रद्द केल्याने त्यांचे सर्व व्यवहार थांबवण्याची मागणी कर्मचारी सहकारी पतपेढीने महापालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांच्याकडे केली आहे.आमच्या संस्थेची मान्यता रद्द झाल्याची माहिती एका फलकाद्वारे कळली आहे. याबाबत कोकण विभागीय सहनिबंधकांचे आदेश अजून प्राप्त झालेले नाहीत. त्यानंतर, पुढील भूमिका घेतली जाईल. मात्र, राजकीय हेतूने किंवा कर्मचाºयांमध्ये फूट पाडण्याकरिता श्रमिक पतसंस्था सुरू केली नव्हती.-वासुदेव शिरवळकर, अध्यक्ष,भाजपप्रणीत श्रमिक पतसंस्थाभाजपप्रणीत पतसंस्था ही कर्मचाºयांच्या नव्हे, तर स्वत:च्या राजकीय आणि आर्थिक फायद्यासाठी सत्तेचा गैरवापर करून काढण्यात आली होती. कर्मचाºयांमध्ये फूट पाडून नियमबाह्य पद्धतीने पतसंस्था सुरू करण्यात आली होती, हे सहनिबंधकांच्या आदेशाने स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी प्रशासन व संबंधितांविरोधात प्रशासकीय व फौजदारी कारवाई केली पाहिजे.- श्याम म्हाप्रळकर, सरचिटणीस, मीरा-भार्इंदर कामगार सेना