ठाणे : ठाणे महापालिकेत थीम पार्क घोटाळ्याचे प्रकरण चर्चेत असताना ४०२ चौरस मीटर जागेवर चार ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राच्या उभारणीच्या प्रस्तावावरून सोमवारच्या महासभेत शिवसेना आणि भाजपाच्या नगरसेवकांमध्ये वादंग झाला.ही केंदे्र उभारण्यासाठी तब्बल तीन कोटी ८७ लाख रु पये खर्च केला जाणार आहेत. रेडीरेकनरचे दर प्रतिचौरस मीटर २२ हजार ५०० रु पये असताना पालिकेने ९४ हजार रु पये दराने बांधकाम कसे काय प्रस्तावित केले, असा सवाल भाजपाचे मिलिंद पाटणकर यांनी केला. त्यामुळे पाटणकर आणि शिवसेनेचे विकास रेपाळे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. केवळ इमारतीचे बांधकामच नव्हे तर तेथील सोयीसुविधांमुळे खर्च जास्त दिसत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. परंतु, घेण्यात आलेल्या आक्षेपामुळे यासंदर्भातील सविस्तर प्रस्ताव पुढील महासभेत सादर करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले.हाजुरी येथील सुविधा भूखंडावर एल्डर्स पॅराडाइज या चार मजली इमारतीचे बांधकाम केले जाणार आहे. ज्यामध्ये बहुउद्देशीय सभागृह, व्यायामशाळा, योगा सेंटर, इनडोअर गेम्स आणि वाचनालय उभारण्याचे प्रस्तावित आहे. या कामासाठी तब्बल तीन कोटी ७८ लाख रु पये खर्च अपेक्षित धरला आहे. परंतु, राज्य सरकारच्या प्रमाणित दरानुसार या कामासाठी साधारणत: एक कोटी रु पये खर्च होणे अपेक्षित असल्याचे मत पाटणकर यांनी व्यक्त केले. मात्र, प्रस्तावित खर्च त्याच्या जवळपास चौपट असल्याचा आरोप त्यांनी केला.
विरंगुळा केंद्राच्या मुद्यावर भाजपा-सेना आमने-सामने; पाटणकर-रेपाळेंमध्ये बाचाबाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:20 AM