शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
4
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
5
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
6
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
7
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
9
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
10
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
11
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
12
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
13
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
14
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
15
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
16
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
17
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
18
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
19
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
20
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."

भाजप उमेदवाराच्या दिरावर प्राणघातक हल्ला

By admin | Published: October 29, 2015 11:27 PM

डोंबिवलीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांना मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच कल्याणमध्ये बुधवारी मध्यरात्री प्रभागात लावलेला बॅनर फाडण्यावरून झालेल्या

कल्याण : डोंबिवलीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांना मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच कल्याणमध्ये बुधवारी मध्यरात्री प्रभागात लावलेला बॅनर फाडण्यावरून झालेल्या वादात एका भाजपा महिला उमेदवाराचा दीर रितेश सिंग याच्यावर गाडी घालून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. यात गंभीर जखमी झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी साहील डोंगरा आणि मित्तल आसवाणी या दोघांवर एमएफसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून यातील एक ाला अटक केली आहे. या प्रकरणात शिवसेनेच्या दोन नगरसेवकांची नावे घेतली गेल्याने हा हल्ला शिवसेनेने केल्याचा आरोप भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांनी केला आहे.येथील प्रभाग क्रमांक ३८ च्या भाजप महिला उमेदवाराच्या प्रचार रॅलीनिमित्त प्रभागात बॅनर लावले होते. उमेदवाराचा दीर रितेश आणि त्याचा मित्र विशाल मोरे हे दोघे मोटारसायकलवरून लावलेले बॅनर पाहत होते. त्या वेळी संपर्क कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या गाडीतून दोघे जण उतरले आणि त्यातील एकाने परिसरात लावलेले बॅनर फाडल्याचे निदर्शनास येताच रितेशने विचारणा केली. त्याचा राग येऊन त्या दोघांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन अन् बीअरच्या बाटलीने त्यांच्यावर प्रहार करून गाडीतून पलायन केले. (प्रतिनिधी)