शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
2
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
3
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
4
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
5
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
6
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विधानसभेत महिलांचा आवाज बुलंद केव्हा होणार?; महामुंबईत फक्त ८ महिला आमदार
11
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात काय घडले?; १३ पैकी ६ आमदार निवडून आले
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?
16
तुमच्या वाहनासाठी आवडीचा क्रमांक घरबसल्या मिळवा; आरटीओची आजपासून ऑनलाइन सुविधा
17
..त्या काळाची फार आठवण येते; ही निवडणूक आणि राजकारणाचा ‘तो’ जमाना
18
हेमंत सोरेन २८ ला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ; पत्नी कल्पना यांनाही बनविणार मंत्री
19
आज यशवंतरावांनी शरद पवारांना काय सल्ला दिला असता?
20
दोन ध्रुव अन् दोन आघाड्या..! प्रादेशिक अस्मिता जपणारे राजकारण सोपे राहिले नाही

भाजपा नगरसेवकाने चोरली फाइल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 6:12 AM

पालिकेच्या बांधकाम विभागाच्या कार्यालयातून फाइलचोरी करताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेले भाजपा नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांना शनिवारी अटक करण्यात आली

उल्हासनगर : पालिकेच्या बांधकाम विभागाच्या कार्यालयातून फाइलचोरी करताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेले भाजपा नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांना शनिवारी अटक करण्यात आली. शुक्रवारी रात्री फाइलचोरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच एकच खळबळ उडाली. त्यानंतर आयुक्तांच्या आदेशानुसार शहर अभियंता महेश शितलानी यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.फाइल चोरी उघड होताच उल्हासनगर पालिकेत चालले आहे काय, असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली. सत्ताधारी भाजपा-ओमी टीम व साई पक्षातील वाद चव्हाट्यावर येऊन शहराचा विकास ठप्प झाल्याचा आरोप होत असताना सत्ताधारी भाजपा नगरसेवक प्रदीप रामचंदानी फाइल चोरतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास बांधकाम विभागाच्या कार्यालयात भाजपाचे स्वीकृत नगरसेवक रामचंदानी, कंत्राटदार शशांक मिश्रा व अभियंता जितू चोयथानी गप्पा मारत होते. बोलणे झाल्यावर तिघेही कार्यालयाबाहेर गेले. मात्र, रामचंदानी पुन्हा फोनवर बोलत तेथे आले आणि त्यांनी कार्यालयाचे कपाट उघडून एक फाइल काढली. ती शर्टमध्ये लपवून ते कार्यालयाबाहेर पडले, असे या व्डिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ शुक्रवारी रात्री व्हायरल झाला. त्यानंतर रामचंदानी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी झाली. शहर अभियंता शितलानी यांनी आयुक्त पाटील यांना माहिती दिल्यावर, त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे आदेश दिले. शितलानी, संदीप जाधव यांनी फाइलचोरीची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून रामचंदानी यांना अटक केल्याने शहर भाजपाची अब्रू गेली आहे.मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख, मनसेचे कामगार नेते दिलीप थोरात यांनी कारवाईची मागणी केली आणि सोमवारी गेट बंद आंदोलन करणार असल्याचे सांगितले. शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते दिलीप मालवणकर यांनी पालिकेत भ्रष्टाचार बोकाळल्याचा आरोप करून लिपिक दर्जाच्या कर्मचाऱ्याकडील वर्ग-१ व २ च्या पदाचा पदभार त्वरित काढून घेण्याची मागणी केली.फाइलचोरीचे अनेक किस्से सतत चर्चेतमहापालिकेत फाइलचोरीची ही काही नवी घटना नाही. यापूर्वीही फाइलचोरीचे अनेक प्रकार झाले आहेत. नगररचनाकार विभागातील फाइल चक्क घरी नेल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वीच घडला होता. अशा अधिकाºयावर कारवाई होण्याऐवजी तत्कालीन आयुक्तांनी त्यांना विशेष पद दिले. अनेक विभागांतील फायली गायब असून यामध्ये नगररचनाकार, बांधकाम, कर, पाणीपुरवठा विभाग सर्वाधिक पुढे आहे.एखाद्या सनदेच्या आधारे पालिकेच्या अनेक इमारतींना दिलेल्या बांधकाम परवान्यांची फाइल गायब होण्याचा प्रकारही शहराला नवा नाही. अशी परवानगी देऊन इमारत उभी राहिली आणि ती वादग्रस्त ठरली किंवा तिच्या चौकशीची वेळ आली की संबंधित परवानगीची फाइलच गायब केली जाते. त्यामुळे कोणी परवानगी दिली ते कधीच उघड होत नाही आणि ती इमारत वापरात येते. दिमाखात तशीच उभी राहते. अशी अनेक प्रकरणे घडूनही त्याबाबात कधीच कोणावर कारवाई झालेली नाही.आमदार ज्योती कलानी यांनी रामचंदानी यांचे नगरसेवकपद रद्द करा आणि त्यांनी, त्यांच्या मुलाच्या नावे गेल्या दहा वर्षांत मिळवलेल्या सर्व ठेक्यांची चर्चा करा, अशी मागणी केली आहे. याच रामचंदानी यांनी ओमी कलानी यांना भाजपामध्ये आणण्यास पुढाकार घेतला होता.

टॅग्स :thaneठाणेBJPभाजपा