शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

तक्रार देण्यास गेलेल्या भाजप नगरसेवकाला टाकले लॉकअपमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 4:09 AM

आमदारांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याने पोलिसांनी त्यांच्याविरोधातही कोविडकाळात गर्दी जमविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

कल्याण : पूर्वेतील भाजप नगरसेवक मनोज राय हे त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गेले असता, पोलिसांनी त्यांनाच लॉकअपमध्ये टाकले. हा प्रकार कळताच भाजप आमदार गणपत गायकवाड यांनीही पोलीस ठाणे गाठून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज साळवे यांना चांगलेच फैलावर घेतले. आमदारांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याने पोलिसांनी त्यांच्याविरोधातही कोविडकाळात गर्दी जमविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.व्यवसायाने बिल्डर असलेल्या राय यांचा एका जागेवरून काही लोकांशी वाद सुरू आहे. या वादाचे रूपांतर शुक्रवारी दुपारी हाणामारीत झाले. राय हे आपली मुले, कार्यकर्त्यांसोबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल नसताना व त्यांची तक्रार न घेताच थेट त्यांच्या दोन मुलांसह त्यांना लॉकअपमध्ये टाकले. हा प्रकार कळताच गायकवाड यांनी पोलीस ठाणे गाठून तेथे त्यांनी साळवे यांना चांगलेच सुनावले.याप्रकरणी राय आणि त्यांच्या विरोधकांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राय यांच्याविरोधात गजानन म्हात्रे यांच्यासह त्यांच्या साथीदारांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. तर, राय यांच्या तक्रारीवरून गजानन म्हात्रे यांच्यासह अन्य जणांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात येऊन गर्दी जमविली. तसेच मास्कही घातले नव्हते. गर्दी जमविल्याप्रकरणी पोलिसांनी गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.>यासंदर्भात गायकवाड म्हणाले की, मी एकटाच तेथे जाब विचारण्यासाठी गेलो होतो. एखाद्या प्रकरणात जाब विचारणे चुकीचे असेल, तर माझ्याविरोधात जो गुन्हा दाखल झाला आहे, त्याविरोधात न्यायालयात दाद मागणार आहे. ज्यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत, ते पोलीस ठाण्यात बसतात. तक्रार करणाऱ्या लोकांविरोधात गुन्हे दाखल करून त्यांनाच लॉकअपमध्ये टाकले जाते. हा कुठला न्याय, असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.