शहरं
Join us  
Trending Stories
1
टोलमाफी, २ नदीजोड प्रकल्पांना मंजुरीसह राज्य मंत्रिमंडळाने घेतले १९ मोठे निर्णय
2
Big Breaking: मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर कारला टोलमाफी
3
“CMपदाच्या चेहऱ्यापेक्षा महाभ्रष्ट महायुती सरकार घालवणे महत्त्वाचे”: बाळासाहेब थोरात
4
"सरकारला उशिराने सुबुद्धी, निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता..."; मुंबई टोलमाफीवर राज ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया
5
कोल्हापूर दौरा, अचानक समोर तालमीतला मित्र दिसला, मोहोळांनी गाडी थांबवून गळाभेट घेतली...
6
स्वप्निलला राज्य सरकारकडून २ कोटी! वडील सुरेश कुसाळेंच्या आरोपांनंतर मोठी घोषणा
7
अरे देवा! जेलमध्ये रामलीला, कैद्यांनी केला वानरांचा रोल; सीतेला शोधायला गेले अन् पळाले
8
Reliance Jio नं लाँच केले २ नवे रिचार्ज प्लॅन्स; केवळ १ रुपयाचा फरक, कोणता आहे बेस्ट? 
9
भाजपा खासदाराने आश्रमात घुसून साधूला केली मारहाण, संतप्त अनुयायांचं आंदोलन
10
कॉमेडीशी संबंध नसताना प्राजक्ताला कसा मिळाला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो? आधी नकार दिला पण...
11
'सिंघम अगेन'सोबत 'भूल भूलैय्या ३'ची मोठी टक्कर! अखेर कार्तिक आर्यनने सोडलं मौन; म्हणाला-
12
'दिवसाढवळ्या हत्या होत असतील तर बरोबर नाही, सलमान खानच्या जवळच्यांना सुरक्षा पुरवा'; मंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी
13
“राज्यात एक फूल दोन हाफ सिंघम, मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द खरा करावा”; संजय राऊतांचा हल्लाबोल
14
नीना गुप्तांनी शेअर केला नातीचा गोड फोटो, म्हणाल्या- "माझ्या मुलीची मुलगी..."
15
उद्यापासून आचारसंहिता लागणार? महायुती सरकारची आज शेवटची मंत्रिमंडळ बैठक!
16
चौदाव्यांदा बोनस शेअर देण्याच्या तयारीत 'ही' दिग्गज कंपनी, स्टॉकनं १ लाखाचे केले ४० लाख; जाणून घ्या
17
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची सुरक्षा वाढवली, IB च्या अलर्टनंतर सुरक्षेत बदल
18
पाकिस्तान जिंकू रे देवा, पण...; टीम इंडियाचं सेमीफायनलचं तिकीट 'शेजाऱ्यांच्या' हाती, पाहा गणित
19
बनावट नोटा बनवण्याची ट्रिक सांगून तरुणाला घातला ५.५ लाखांचा गंडा; काय आहे हे प्रकरण?
20
Hyundai Motor IPO मध्ये 'हे' गुंतवणूकदार आजपासून करू शकतात गुंतवणूक, ग्रे मार्केटमध्ये स्टॉक आपटला

मीरा-भार्इंदर पालिकेच्या तिन्ही समितींत भाजपाचेच वर्चस्व; सदस्यांची नावे जाहीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 8:01 PM

 मीरा-भार्इंदर महापालिकेची विशेष महासभा सोमवारी पार पडली. तीच्या सुरुवातीलाच नवीन स्थायी समितीसह महिला व बाल कल्याण समिती तसेच वृक्षप्राधिकरण व उद्यान समितीतील सदस्यांच्या नावांची घोषणा

भार्इंदर: मीरा-भार्इंदर महापालिकेची विशेष महासभा सोमवारी पार पडली. तीच्या सुरुवातीलाच नवीन स्थायी समितीसह महिला व बाल कल्याण समिती तसेच वृक्षप्राधिकरण व उद्यान समितीतील सदस्यांच्या नावांची घोषणा महापौर डिंपल मेहता यांनी केली. पालिकेत यंदा भाजपाची एकहाती सत्ता असल्याने सर्व समित्यांवर भाजपाचेच वर्चस्व असल्याने सेना, काँग्रेसला केवळ विरोधकांचीच भूमिका पार पाडावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

आॅगस्टमध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक ६१ जागा, सेनाला २२ तर काँग्रेसला १० जागा व काँग्रेस पुरस्कृत अपक्षांना दोन जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसने कोकण विभागीय आयुक्तांकडे दिलेल्या तौलनिक सदस्य संख्या बळानुसार अपक्ष व काँग्रेसची काँग्रेस लोकशाही आघाडी स्थापन करण्यात आली आहे. या सर्व समित्यांत बहुमतामुळे भाजपाचे वर्चस्व असुन सेना, काँग्रेस मात्र विरोधापुरती राहणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. एकुण ९५ जागांनुसार स्थायीतील एकुण सदस्य संख्या १६ तर महिला व बाल कल्याण आणि वृक्षप्राधिकरण व उद्यान समितीतील सदस्यसंख्या प्रत्येकी १५ इतकी आहे. याप्रमाणात भाजपाच्या वाट्याला सर्व समित्यांत प्रत्येकी १० जागा आल्या असुन सेनेला स्थायीत ४ व उर्वरीत दोन समित्यांत प्रत्येकी ३ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला स्थायीसह उर्वरीत दोन समित्यांत प्रत्येकी २ जागा प्राप्त झाल्या आहेत. या समित्यांत नवीन सदस्यांची नावे सोमवारच्या विशेष महासभेत महापौरांकडुन जाहिर करण्यात आली. त्यात स्थायीसाठी भाजपाकडुन गटनेते हसमुख गेहलोत, ध्रुवकिशोर पाटील, अ‍ॅड. रवि व्यास, मीरादेवी यादव, अशोक तिवारी, प्रशांत दळवी, मेघना रावल, सुरेश खंडेलवाल, अनिल विराणी व मोहन म्हात्रे, सेनेकडुन तारा घरत, अनिता पाटील, दिप्ती भट व वंदना विकास पाटील तर काँग्रेस लोकशाही आघाडीकडुन जुबेर इनामदार व नुरजहाँ नझर हुसेन यांची नावे जाहिर करण्यात आली. महिला व बाल कल्याण समितीसाठी भाजपाकडुन शानू गोहिल, ज्योत्स्रा हसनाळे, वंदना भावसार, सुनिता भोईर, सीमा शाह, सुरेखा सोनार, नयना म्हात्रे, वैशाली रकवी, दिपिका अरोरा व रक्षा भुप्तानी, सेनेकडुन अर्चना कदम, कुसुम गुप्ता व हेलन गोविंद जॉर्जी तर काँग्रेस लोकशाही आघाडीकडुन रुबीना शेख व सारा एहमद यांची नावे जाहिर करण्यात आली. वृक्षप्राधिकरण व उद्यान समितीसाठी भाजपाकडुन विनोद म्हात्रे, गणेश शेट्टी, सचिन म्हात्रे, प्रिती पाटील, नीला सोन्स, मीना कांगणे, मनोज दुबे, गणेश भोईर, सुजाता पारधी व हेमा बेलानी, सेनेकडुन आनंद शिर्के, एलायस बांड्या व कमलेश भोईर तर काँग्रेस लोकशाही आघाडीकडुन राजीव मेहरा व अमजद शेख यांची नावे जाहिर करण्यात आली. महासभेच्या सुरुवातीला भाजपा आ. नरेंद्र मेहता यांच्या पत्नी सुमन यांनी पत्रकार कक्षात हजेरी लावुन राजकीय डावपेच शिकण्यास सुरुवात केल्याचे पक्षाच्या सुत्राकडुन सांगण्यात आले. यावरुन आगामी राजकारणात त्यांचे पदार्पण होणार असल्याचे संकेत मिळु लागले आहेत. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक