शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

खापरी ग्रामपंचायतीवर भाजपाचे वर्चस्व, सातपैकी सहा जागांवर विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 2:49 AM

खापरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी झाली. चारपैकी तीन जागा भाजपाच्या पदरात पडल्या आहेत, तर एक जागा राष्ट्रवादीला मिळाली. दोन जागांवर भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

मुरबाड - खापरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी झाली. चारपैकी तीन जागा भाजपाच्या पदरात पडल्या आहेत, तर एक जागा राष्ट्रवादीला मिळाली. दोन जागांवर भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.सात सदस्यांच्या या ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र मांक-२ मध्ये दोन जागा बिनविरोध झालेल्या होत्या. एका जागेसाठी निवडणूक होऊन प्रमिला सूर्यराव यांनी आरती राऊत यांचा पराभव केला, तर प्रभाग क्र मांक-१ मध्ये एक जागा भाजपाला व एका जागेवर राष्ट्रवादीचे सुधाकर माळी विजयी झाले. प्रभाग-३ मध्ये दोन्ही जागा भाजपाने बळकावल्या. मात्र, सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपाचे दोन उमेदवार रिंगणात राहिल्याने याचा फटका त्या पक्षाला बसून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला. भाजपाच्या दोन उमेदवारांत पंचायत समितीचे माजी सदस्य अनिल घरत यांनी समझोता केला होता. परंतु, ऐनवेळेस हे घडल्याने याचा फटका भाजपाला बसला.ही निवडणूक राष्ट्रवादीने अतिशय प्रतिष्ठेची केली होती. सर्व पर्याय वापरून कोणत्याही परिस्थितीत एकहाती सत्ता घ्यायचीच, असा चंग बांधला होता.परंतु, सातपैकी सहा जागा भाजपाने पटकावून राष्ट्रवादीचे बहुमताचे स्वप्न धुळीस मिळवले. अशोक राऊत, सुधाकर माळी, नंदा बांगरा व प्रमिला सूर्यराव हे भाजपाचे सदस्य निवडून आले, तर हंसा मेंगाळ, नरेंद्र खोडका हे दोन सदस्य बिनविरोध आले होते.भाजपाच्या एकमेव सदस्या विमल राऊत या निवडून आल्या आहेत. निवडून आलेल्या सर्व सदस्यांचे आमदार किसन कथोरे यांनी आभार मानले आहेत.चार ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवाशहापूर : तालुक्यातील गोठेघर, वाफे, खुटघर, साकुर्ली आणि रानविहीर ग्रामपंचायतींपैकी महत्त्वाच्या चार ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. ढोलताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत शिवसेनेने या विजयाचा गुरुवारी जल्लोष केला.तालुक्यातील गोठेघर, वाफे, खुटघर, साकुर्ली ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसह रानविहीर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी बुधवारी निवडणूक प्रक्रि या पार पडली. गुरुवारी शहापूर तहसील कार्यालयात मतमोजणी पार पडली. शहरालगत असलेल्या व संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोठेघर, खुटघर, वाफे या ग्रामपंचायतींसह रानविहीरच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने दणदणीत विजय मिळवला. गोठेघर ग्रामपंचायतीच्या अकरापैकी सहा जागांवर सेनेने विजय मिळवला. सरपंचपदावर रु चिरा पिंपळे या विजयी झाल्या आहेत. वाफे ग्रामपंचायतीमधील अकरापैकी सात जागा सेनेने काबीज केल्या. सरपंचपदी शिवसेनेचे संजय रामा दळवी विजयी झाले. खुटघर ग्रामपंचायतीच्या सर्व सातही जागांवर शिवसेनेने वर्चस्व प्रस्थापित केले. सरपंचपदी मनीषा सुरेश वाघ विजयी झाल्या आहेत. रानविहीर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या अलका भगत विराजमान झाल्या आहेत. निवडणुकांचे निकाल घोषित झाल्यानंतर शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख मारु ती धिर्डे, भरत बागराव, प्रशांत गडगे, भगवान अधिकारी, आनंद अधिकारी, सतीश अधिकारी यांच्यासह इतर शिवसैनिक उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपाnewsबातम्या