शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपाचे वर्चस्व; 18 जागांपैकी 15 जागांवर विजय

By पंकज पाटील | Published: April 30, 2023 8:49 PM

तीन जागांवर शिवसेनेच्या शिंदे गटाला विजय मिळवता आला आहे.

अंबरनाथ:उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक रविवारी पार पडले या निवडणुकीचा निकाल सायंकाळी लागला असून 18 जागांपैकी 15 जागांवर भाजपाने वर्चस्व निर्माण केले आहे, तर तीन जागांवर शिवसेनेच्या शिंदे गटाला विजय मिळवता आला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे.

उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक रविवारी पार पडली. या निवडणुकीतील मतदानाची प्रक्रिया अंबरनाथच्या सूर्योदय सभागृहात पार पडली. उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत १८ संचालकांच्या जागा असून त्यासाठी ३३ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते. यापैकी भाजपनं सर्वच्या सर्व १८ जागी उमेदवार दिले होते, तर शिवसेनेने ६ जागी उमेदवार दिले असून ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी १-१ उमेदवार उभा केला होता.

सूर्योदय सभागृहात मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर सायंकाळी मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. मतमोजणीची प्रक्रिया संपल्यानंतर 18 पैकी 15 जागांवर भाजपाने आपले निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे. तर शिवसेनेच्या शिंदे गटाला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले. उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आमदार किसन कथोरे यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात होती.

त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी देखील ही निवडणूक जिंकण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. अखेर भाजपाने 15 जागा जिंकत पुन्हा एकदा कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपला झेंडा फडकवलाय. हा विजय खऱ्या अर्थाने आमदार किसन कथोरे यांच्या कुशल नेतृत्वाचा असल्याचे मत भाजपाचे पदाधिकारी राजेश पाटील यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :APMC Electionकृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकulhasnagarउल्हासनगर