शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

मीरा-भाईंदरमध्ये आवाज भाजपाचाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:03 AM

भाजपा-शिवसेना यांची वरिष्ठ पातळीवर युती झाली असली तरी मीरारोड व भाईंदर या दोन शहरात शिवसेनेला डिवचण्याची, त्यांना दूषणे देण्याची एकही संधी आ. नरेंद्र मेहता यांनी सोडलेली नाही.

- धीरज परब, मीरा-भाईंदरभाजपा-शिवसेना यांची वरिष्ठ पातळीवर युती झाली असली तरी मीरारोड व भाईंदर या दोन शहरात शिवसेनेला डिवचण्याची, त्यांना दूषणे देण्याची एकही संधी आ. नरेंद्र मेहता यांनी सोडलेली नाही. महापालिकेतील बहुमताची सत्ता हेच त्याचे कारण असून या दोन शहरांत तरी आवाज भाजपाचाच चालणार, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.जपा व शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी एकमेकांची उणीदुणी काढण्यात कोणतीही कसर ठेवली नसली तरी लोकसभा व त्या पाठोपाठ होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत युती केली आहे. लोकसभेच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून भाजपा व शिवसेना युतीचे घोडे गंगेत न्हालं असलं तरी मीरा-भार्इंदरमध्ये मात्र युती अजुनही मुर्धाच्या खाडीत गटांगळ््या खात आहे. महापालिकेत भाजपाची एकहाती असलेली सत्ता आणि सुसाट नेतृत्वाला शिवसेनेची अजिबात न उरलेली गरज यामुळे सेनेने कितीही युतीची टाळी दिली तरी भाजपा कडून हात आखडता घेतला जातोय. सेनेच्या लहानसहान सुचना सुध्दा भाजपाने धुडकावून लावल्या आहेत. शिवाय लोकसभा, विधानसभा निवडणुकीत सेनेला शहरात भाजपाचे पाय धरावेच लागणार आहेत. त्यामुळे मीरा भार्इंदरमध्ये आवाज फक्त भाजपाचाच चालणार असे आ. नरेंद्र मेहता सेनेला वारंवार विविध माध्यमातून ठणकावून सांगत आहेत.साम, दाम, दंड व भेदाचे बाळकडू प्यायले असल्याने आ. मेहतांनी पालिका जिंकण्यासाठी निवडणुकीच्या आधीपासूनच आपले कसब पणाला लावले आहे. पक्ष संघटना बांधणीत तर भाजपाने सेनेला कुठल्या कुठे मागे फेकले. पालिका जिंकून मुख्यमंत्र्यांना भेट देण्याचा चंग बांधलेल्या आ. मेहतांना स्थानिक पक्ष कार्यकर्ते, उमेदवार, सहकाऱ्यांपासून थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत भक्कम साथ मिळाली. पालिका खिशात घालत मेहतांनी मुख्यमंत्री दरबारी आपले वजन आणखी वाढवले.मुख्यमंत्र्यांचा वरदहस्त लाभल्याने आ. मेहतांनी महापालिका तर आपल्या मुठीत ठेवली आहेच, पण पोलीस, महसूल, नगरविकास, सांस्कृतिक, वन आदी विभाग खिशात ठेवले आहेत. याला कारण आ. मेहतांचे जातीने असलेलं बारीक लक्ष, दिवसरात्र वेळ देणे आणि हात धुऊन एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे हेच कारण आहे.शिवसेनेकडे शहरात अभ्यासू, मुद्देसुद व आक्रमक असं नेतृत्वच नाही. त्यामुळे सर्व भिस्त आहे ती केवळ आमदार प्रताप सरनाईकांवर. मध्यंतरी एकमेकांविरोधात आरोपप्रत्यारोप करताना त्यांनी टोकाची पातळी गाठली होती. खासदार म्हणून सेनेचे राजन विचारे असले तरी ते पालिका व शहराच्या घडमोडीत फारशी ढवळाढवळ करीत नाहीत.विरोधी पक्ष नेतेपद, समिती सभापतीपद व दालनांपासून नगरसेवकांचा प्रभाग समिती निधी असो की प्रभागातील लहानसहान कामे. आ. मेहतांच्या दबावामुळे पालिका प्रशासन सेनेच्या नगरसेवकांना झुलवत ठेवत आहे. नगरसेवकांचे सोडा खुद्द आ. सरनाईकांना सुद्धा कोंडीत पकडण्याची एकही संधी मेहता सोडताना दिसत नाहीत. घोडबंदर किल्ल्या वरील सेनेच्या कार्यक्रमाचे निमंत्रण सरनाईकांनी त्यांना दिले. पण मेहतांनी तो कार्यक्रम टाळला. उलट विचारे, सरनाईक मेहतांच्या मंदिराच्या कार्यक्रमाला आवर्जून हजर राहिले.स्थायी समिती सभेत अर्थसंकल्पाला सेनेच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला. पण भाजपाने मात्र आपल्याला सेनेची गरज नसल्याचा अविर्भाव कायम ठेवला. मेहतांनी तर बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवन व कलादालनाची निविदा स्थायी समितीमध्ये मंजुर करु दिली नाही. अर्थसंकल्पात शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवनासाठी दोन कोटींची वाढ, डॉ. बाबासाहेब सांस्कृतिक भवनासाठी नवीन लेखाशीर्षांतर्गत १ कोटींची तरतूद, घोडबंदर किल्ल्यासाठी आणखी एक कोटींची वाढ सुचवली. मात्र भाजपाने महासभेत त्या सूचना धुडकावून लावल्या. भाजपाने आपला ताठरबाणा कायम ठेवत सेनेला नामोहरम करण्याची एकही संधी सोडलेली नाही.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरBJPभाजपा