शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाही?; ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत
2
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
3
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
4
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
5
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
6
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
8
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
9
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
10
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
11
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
12
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
13
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
14
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
15
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
17
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
18
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
19
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी

भाईंदरमध्ये सेनेच्या विभागप्रमुखाला भाजप गटनेत्याकडून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:23 AM

मीरा-भाईंदर महापालिकेतील भाजप गटनेते हसमुख गेहलोत यांनी मुलांच्या खेळण्यावरून झालेल्या वादात शिवसेनेचे विभागप्रमुख सतीश अंचेकर (५७) यांना मारहाण केली.

भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिकेतील भाजप गटनेते हसमुख गेहलोत यांनी मुलांच्या खेळण्यावरून झालेल्या वादात शिवसेनेचे विभागप्रमुख सतीश अंचेकर (५७) यांना मारहाण केली. याप्रकरणी नवघर पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. तर, मुलांच्या खेळण्याचे निमित्त असून राजकीय आणि सोसायटीचावाद यामागे आहे, असे अंचेकर याचे म्हणणे आहे. भार्इंदर पूर्वेला गोल्डन नेस्ट वसाहतीजवळ विधी हाइट्स नावाची इमारत आहे. या इमारतीत शिवसेनेचे विभागप्रमुख अंचेकर राहत असून ते गृहनिर्माण संस्थेचे सचिव आहेत. याच इमारतीत भाजप गटनेते हसमुख गेहलोत यांची सदनिका आहे. मात्र, गेहलोत हे कुटुंबीयांसह शेजारच्या विधी अपार्टमेंटमध्ये राहतात. अंचेकर यांच्या म्हणण्यानुसार, रविवारी सायंकाळी गेहलोत यांचा लहान मुलगा हिरण्य (११) हा अन्य दोघा मुलांसह विधी हाइट्स इमारतीत खेळण्यासाठी आला होता. शेजारी राहणाऱ्या लहान मुलाने बाजूच्या इमारतीतूनमुले येतात आणि आम्हाला खेळू देत नाहीत, अशी तक्रार केली. त्यावरून मी गेहलोत व अन्य मुलांना तुम्ही तुमच्या इमारतीच्या आवारात जाऊन खेळा, असे सांगितले. काही वेळाने गेहलोत हे पत्नी, मुलासह आले आणि मुलाला शिवी का दिली म्हणून दरडावू लागले. मी शिवी कशाला देऊ, असे सांगूनही त्यांनी मला बॅटने रक्त निघेपर्यंत मारहाण केली, असे अंचेकर म्हणाले. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यास गेलेल्या अंचेकर यांना पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल करून घेण्यास नकार देत तक्रार अर्ज द्या, असा पवित्रा घेतला होता. रक्त निघत असूनही पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने थेट खासदार राजन विचारे आदींनी चांगलीच कानउघाडणी केली. त्यानंतर पोलिसांनी गेहलोत यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला.मुलांचे निमित्त गेहलोत करत असून याआधीही त्यांनी तीन वेळा असे प्रकार केले आहेत. विधी हाइट्सच्या तळमजल्यावर बिल्डरच्या संगनमताने दोन सदनिका बेकायदा बांधल्या होत्या. त्या आम्ही तक्रारी करून तोडायला लावल्या. त्याचा रोष आहे. शिवाय, शिवसेनेचे पदाधिकारी असून गेहलोत आता स्थानिक नगरसेवक आहेत. मुलांचे निमित्त असून शिवीगाळ केलेली नाही, असे अंचेकर म्हणाले.>शिवीगाळ केल्याचा गेहलोत यांचा आरोपगेहलोत यांनी मात्र अंचेकर यांनी मुलास शिवीगाळ केली. त्याच्यासोबतच्या मुलांनीही तसे त्यांच्यासमोरच सांगितले. माझी सदनिका त्या इमारतीत आहे. मुलांना खेळण्यास मनाई करणे, शिवीगाळ करणे निंदनीय आहे. अंचेकर अन्य कारणे सांगून दिशाभूल करत असल्याचे गेहलोत म्हणाले.