कल्याण - टाटा आमंत्रा येथील कोविड सेंटरच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन कोरोना रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना काल घडली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज केली आहे.
टाटा आमंत्रा कोविड सेंटरच्या पाचव्या मजल्यावरुन कोरोना रुग्ण प्रशांत आंबेकर याने उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेची दखल घेत आज भाजप नेते सोमय्या यांनी टाटा आमंत्राला भेट दिली. यावेळी भाजप आमदार रविंद्र चव्हाण, महेश चौगूले, भाजप पदाधिकारी संतोष शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी टाटा आमंत्र येथील अधिकारी वर्गाची सोमय्या यांनी भेट घेतली. प्लोअरच्या पॅसेजमध्ये जाळी नाही. ती जाळी तातडीने लावली जावी अशी मागणी सोमय्या यांनी केली. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच कोरोनावर अद्याप लस देखील आलेली नाही. त्यामुळे अनेक रुग्ण धास्तावलेले आहेत. त्यासाठी प्रत्येक कोविड सेंटरमध्ये मानस उपचार तज्ज्ञ नेमण्यात यावी. ज्याचाकडून रुग्णाचे समुपदेशन केले जाईल. कल्याण डोंबिवली व भिवंडी परिसरात रुग्ण पळून जाणे, आत्महत्या करणे या सारख्या चार घटना आतापर्यंत घडलेल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा वारंवार वाढत आहे. तो कमी होत नाही. त्यामुळे रुग्णांमध्ये भयाचे वातावरण आहे याकडे सोमय्या यांनी लक्ष वेधले आहे.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा नामोल्लेख न करता सोमय्या यांनी पवार यांच्यावर टिका करताना काही नेते रामजन्मभूमीवर भाष्य करण्यात मशगूल आहेत. पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चार महिन्यापासून फेसबूकवर संवाद साधत आहे. या फेसबूक लाईव्हचा जनतेला कंटाळा आला आहे. फेसबूक लाईव्ह करण्यापेक्षा कल्याण डोंबिवली व भिवंडीतील कोरोना रुग्णांची संख्या रोखण्यासाठी आरोग्याच्या काय सोयी सुविधा पुरविल्या याचे उत्तर द्या. आरोग्य मंत्री राजेश टोपे व अनिल देशमुख या सगळ्य़ा परिस्थितीला जबाबदार असून ठाकरे सरकार आत्ता तरी जागे व्हा असे आवाहन सोमय्या यांनी केले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मेट्रो सिटीत IS ची कमान महिलांच्या हाती; NIAचा मोठा खुलासा
Vikas Dubey Encounter : कुख्यात गँगस्टर विकास दुबेचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला समोर, झाला मोठा खुलासा
दहा रुपये, समोसा अन् घडली भयावह घटना; शाळकरी मुलाने गळफास लावून केली आत्महत्या