शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

भाजप आमदार नरेंद्र मेहता, पालिका आयुक्तांवर गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 2:34 AM

न्यायालयाचे आदेश; ७११ वादग्रस्त क्लब, तारांकित हॉटेल प्रकरण

ठाणे : मीरारोडच्या कनकिया भागातील वादग्रस्त ७११ क्लब तथा तारांकित हॉटेल प्रकरणी अखेर भाजप आमदार नरेंद्र मेहतांसह पालिका आयुक्त व सर्व संबंधित अधिकाऱ्यां विरोधात मीरारोड पोलिसांनी अखेर शनिवारी गुन्हे दाखल केले. मुंबई उच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी दिलेल्या आदेशावरुन ही कारवाई करण्यात आली.कनकिया भागातील नाविकास क्षेत्र, सीआरझेड, भरतीची उच्चतम रेषा, कांदळवन असलेल्या जागेत बेकायदेशीर भराव घालून पर्यावरणाचा ºहास केल्याबद्दल तब्बल चार गुन्हे दाखल केले. तसेच पालिकेने देखील एमआरटीपीखाली गुन्हा दाखल केला होता.महापालिकेने वादग्रस्त ठिकाणी विकास नियंत्रण नियमावली व दाखल गुन्हे दुर्लक्षित करुन २०१५ साली पहिली बांधकाम परवानगी दिली. बेसमेंट, तळअधिक एक मजला अशी जिमाखाना वापरासाठी दिलेली बांधकाम परवानगी २०१७ मध्ये जिमखाना व क्लब हाऊस अशी सुधारीत करुन दिली. २०१८ मध्ये क्लब हाऊस व तारांकित हॉटेल करीता अधिकचे एक चटईक्षेत्र देण्यात आले.या ठिकाणी कोणताही राज्य व राष्ट्रीय महामार्ग नसताना शासनाच्या २०१५ मधील अधिसुचनेचा महामार्गालगतचा हवाला देऊन एक चटईक्षेत्र मंजूर करुन घेतले. याबाबतच्या तक्रारीची पोलीसांनी दखल घेतली नव्हती. त्यामुळे उच्च न्यायालयात याचिका दाखल केली गेली असता न्यायालयाने तक्रारदाराच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्याअनुषंगाने शनिवारी आ. मेहतांसह पालिका आयुक्त व संबंधित अधिकारी यांच्या विरोधात मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यातआला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर आ. मेहता अडचणीत आले आहेत.

टॅग्स :BJPभाजपा