शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
5
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
6
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
7
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
8
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
9
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
10
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
11
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
12
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
13
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
14
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
15
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
16
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
17
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
18
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
19
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान

भाजप-ओमी टीमचे वर्चस्व, शिवसेनेच्या वाट्याला अवघी एक समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 11:07 PM

उल्हासनगर पालिका : शिवसेनेच्या वाट्याला अवघी एक समिती

सदानंद नाईकलोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : महापालिका विशेष समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत महाविकासला भाजपने चितपट केले. एकूण ९ विशेष समिती सभापतीपदापैकी शिवसेना एक व मित्र पक्ष असलेल्या रिपाइं गटातील पीआरपी पक्षाला एक असे दोन समिती सभापती पदावर समाधान मानावे लागले.  उल्हासनगर महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असताना शिवसेना आघाडीने भाजपातील बंडखोर ओमी टीम समर्थक नगरसेवकांच्या मदतीने महापौर, उप-महापौर पदांसह स्थायी समिती सभापतीपद पटकावले, तसेच प्रभाग समिती सभापती निवडणुकीत वर्चस्व सिद्ध केल्यानंतर विशेष समिती  सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना आघाडी पुन्हा भाजपला चितपट करेल, असे वातावरण निर्माण झाले होते; परंतु भाजपने पक्षातील बंडखोर ओमी टीम समर्थक नगरसेवकांसोबत मिळतेजुळते घेऊन ९ पैकी ३ समिती सभापतीपदे पदरात पाडून घेतली, तर ओमी टीमकडे ४ महत्त्वाचे सभापतीपदे गेली.  

शिवसेना व मित्र पक्षाच्या वाटेला प्रत्येकी  एक असे दोन सभापती पदे मिळाली. ९ पैकी ७ समित्यांच्या सभापती पदाची निवडणूक बिनविरोध झाली. क्रीडा व पाणी पुरवठा समिती सभापती पदासाठी भाजप-शिवसेना आमनेसामने उभी ठाकले; मात्र पराभवाच्या भीतीने निवडणुकीच्या काही मिनिटांपूर्वी पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपचे दोन्ही उमेदवार सभापतीपदी निवडून आले. यात सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी डिंपल ठाकूर, नियोजन व विकास समिती सभापतीपदी दीपा पंजाबी, पाणी पुरवठा समिती सभापती अजित गुप्ता, आरोग्य समिती सभापतीपदी शंकर लुंड, क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या सभापतीपदी गीता साधवाणी, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी ज्योती पाटील, महसूल समिती सभापतीपदी कविता गायकवाड असे ९ पैकी ७ समित्या भाजप व पक्षातील बंडखोर ओमी टीमकडे गेल्या. तर शिवसेनेच्या शुभांगी बेहनवाल यांच्याकडे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण समिती सभापतीपद तसेच रिपाइंतील पीआरपी गटाचे प्रमोद टाले यांच्याकडे गलिच्छ नागरी समिती सभापतीपद गेले आहे. पालिकेतील राजकारण पुन्हा पेटणार हे निश्चित.

ओमी कलानी टीम नेमकी कुणाकडे? विधानसभा उमेदवारी कलानी कुटुंबाला दिली नसल्याच्या निषेधार्थ भाजपातील ओमी टीम समर्थक नगरसेवकांनी महापौर-उपमहापौर निवडणुकीत भाजप उमेदवाराऐवजी शिवसेना-रिपाइंच्या लिलाबाई अशान व भगवान भालेराव याना मतदान करून महापौर-उपमहापौरपदी निवडून आणले. स्थायी समिती सभापती, परिवहन समिती सभापतीपाठोपाठ प्रभाग समिती सभापतीपदी शिवसेना? आघाडीचे वर्चस्व पाहिले; मात्र विशेष समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपने ओमी कलानी टीमसोबत जुळवून घेतल्याने त्यांना ९ पैकी ७ सभापतीपदे मिळाली. या निवडणुकीनंतर ओमी कलानी टीम नेमकी कुणाकडे भाजप की शिवसेना? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर