उल्हासनगर :
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उधोगपती अदानी यांच्या व्यवहारावर राहुल गांधी यांनी भाष्य केल्यानेच, भाजप प्रणित केंद्र सरकारने खोट्या तक्रारी करून गांधी यांची खासदारकी रद्द केली. या घटनेचा निषेध शहर काँग्रेसने याबाबतची माहिती पत्रकारांना दिली.
उल्हासनगर काँग्रेसच्या वतीने गेल्या आठवड्यात राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याचा निषेधार्थ नेताजी चौकात आंदोलन केले होते. उधोगपती अदानीच्या महाघोटाळा संदर्भात मोदी सरकारला अनेक राहुल गांधी यांनी संसदेत विचारून कोंडीत पकडले होते. मोदी आणि अदानी यांचे संबंध काय? महाघोटाळा मधील २० हजार कोटी कोणाचे आहेत? आदी प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित करून मोदींच्या कारभाराची चिरफाड केली. याच रागातून षड्यंत्र रचून गांधी यांची खासदारकी रद्द केल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रोहित साळवे यांनी केला. काँग्रेस पक्षाने अदानी बाबत जेपीसीची मागणी लावून धरल्याने, संसदेचे कामकाज ठप्प पडत आहे.
भाजपा ओबीसी समाजाचा संबंध भ्रष्टाचारांशी जोडून ओबीसी समाजाचा अपमान करीत आहे. राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न मोदी सरकार करीत असल्याचा आरोप शहर काँग्रेस कडून होत आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेब यांच्या आदेशानुसार राज्यभर आंदोलन सुरू असून याबाबतची माहिती जिल्ह्यातील पत्रकारांना दिली जात आहे. त्याच अनुषंगाने उल्हासनगर प्रभारी माजी खासदार हुसेन दलवाई, सहप्रभारी मनोज शिंदे व जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वात पत्रकारांना माहिती देण्यात आली आहे.
काँग्रेस पदाधिकारी आक्रमक महापालिकेच्या माजी गटनेता अंजली साळवे, किशोर धडके, नानिक आहुजा, वज्जिरुदिन खान, मनीषा महाकाळे, विशाल सोनवणे, नारायण गेमनानी, चिराग फक्के आदी जणांनी पत्रकार यांना माहिती देऊन आंदोलन केले.