डोंबिवली : कळवा रेल्वेस्टेशनच्या दरम्यान मोबाइल चोराच्या झटापटीमध्ये डोंबिवलीच्या विद्या पाटील यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात तीन लहान अपत्ये आहेत, कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या घरातील एका सदस्याला रेल्वेत नोकरी मिळावी आणि आर्थिक साहाय्य मिळावे यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. पक्षाच्या वतीने सोमवारी प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी त्यांच्या कुटुंबीयाची भेट घेऊन एक लाख रुपयांचे अर्थसाहाय्य दिले.
रेल्वेतील नोकरीसाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या निर्देशानुसार भाजप वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करीत आहे. डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनीही काही दिवसांपूर्वी त्या कुटुंबीयांची घरी जाऊन भेट घेतली होती.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे, नगरसेविका कविता म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस प्रज्ञेश प्रभूघाटे, समीर चिटणीस, जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा नगरसेविका रेखा चौधरी, मनीषा राणे, माजी नगरसेविका सुनीता पाटील, पूनम पाटील, विद्या म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
------------