डोंबिवली- स्टार कॉलनी येथील साईबाबा मंदिर येथे होणा-या वाहतूक कोंडीकडे वाहतूक पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे भाजपाच्या रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने शनिवारी स्टार कॉलनी, साईबाबा मंदिर येथे आंदोलन करण्यात आले. यासंदर्भात कोळशेवाडी वाहतूक पोलिसाकडे या वाहतूक कोंडीची तक्रार करण्यात आली होती, पण तरीही तक्रारीची दखल न घेतल्याने आंदोलन करण्यात आले.
या आंदोलन समयी शेकडो रिक्षा चालक मानपाडा रोडवर स्टार कॉलनी नजीक पुलाखाली नाल्याचे काम सुरु असल्याने 2 मे पासून कोलशेवाडी वाहतूक शाखेच्या वतीने मानपाडा रोडवरील वाहतूक शिवाजी उद्योग नगर मार्गे वळवण्याचा निर्णय घेतला होता. तसेच पी अँड टी काँलनीतून साईबाबा मंदिर मानपाडा रोडवरुन येणा-या सर्व वाहनांना नो एन्ट्री केली होती. परंतु अवघ्या दोन दिवसानंतर या वाहतूक व्यवस्थेची अंमलबजावणी करण्यात आली. तेथे नेमणूक करण्यात आलेला वाहतूक पोलीस दोन दिवसानंतर नाहीसे झाले.
त्यामुळेच वाहन चालकांना मोकळे रान मिलाल्याने नो एन्ट्री मार्गे बिनधास्तपणे पी अँड टी कॉलनीतून साईबाबा मंदिर येथे येत असल्याचे संघटनेचे कार्याध्यक्ष संजय देसले, खनिदार दत्ता माळेकर यांनी सांगितले. त्यामुळे येथे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. याची तक्रार कोळासेवाडी वाहतूक शाखेला करुन सुद्धा दखल न दिल्याने भाजपाच्या डोंबिवली रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्यावेळी त्यांच्यासमवेत रिक्षाचालकांसह सोबत संघटनेचे सरचिटणीस प्रमोद गुरव, रतन पुजारी आदी उपस्थित होते. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक पी. जाधव यांनी मध्यस्थी करत सगळयांना शांत केले, तसेच कोंडी टाळण्यासाठी तेथे पूलाचे काम होईस्तोवर कायमस्वरुपी पोलीस तैनात करणार असल्याचे सांगितले.