शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

राज्यातील मंदिर उघडण्यासाठी भाजपा 29 ऑगस्टला करणार घंटानाद; रवींद्र चव्हाण यांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 5:40 PM

गुढी पाडवा नववर्ष स्वागत यात्रा नाही. सगळ्यानी निमूटपणे स्वीकारलं आणि पाडवा घरीच केला.

डोंबिवली:  भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक प्रकोष्ठच्यावतीने देवालये पूर्ववत देवदर्शनासाठी सुरु करण्यासाठी संघर्ष करणार आहे. त्याचाच भाग म्हणून शनिवार, २९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात गावोगावी खेडोपाडी शहरात नगरात जोरदार घंटानाद आंदोलन करणार आहे. भाविकांनी उपस्थित राहून सहभाग घ्यावा आणि झोपलेल्या सरकारला जागे करूया असे आवाहन पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले आहे.

गुढी पाडवा नववर्ष स्वागत यात्रा नाही. सगळ्यानी निमूटपणे स्वीकारलं आणि पाडवा घरीच केला. रामनवमीला श्रीरामाचे मुखदर्शन नाही. हनुमान जयंतीला बजरंगबलीच्या चरणस्पर्शाला पारखे झालो,अंतर राखलं. महिलांनी वट पौर्णिमेचा व्रत घरातूनच जपलं. चातुर्मास सुरु झाला.आषाढी एकादशीला ठोबाच्या दर्शनाला आतुर झालो, अजून नको अंतर राखा. म्हणून माऊलीला मनातूनच दंडवत घातला. गुरुपौर्णिमेला दत्तगुरूंना साष्टांग नमस्कार राहूनच गेला.

पवित्र श्रावण महिना आला, आणि गेला. श्रावणी सोमवारी शिवशंकराच्या पिंडीवर बेलपत्री वाहिलीच नाही. दहीहंडीच्या उत्सहाला मुरड घातली.गणपती बाप्पा आले. आता गौरी पूजनही संपन्न झाले. पण आता पुरे झाले.  राज्य सरकारने आता बासच करावे. भक्तांना देवदर्शनाची आस लागली आहे. लवकरात लवकर देवालय सुरु करावी यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारTempleमंदिरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे