शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

उल्हासनगर महापालिकेच्या तोडक कारवाईविरोधात भाजपा-रिपाइंचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 5:50 PM

महापालिका प्रशासनाच्या आश्वासनावर संतुष्ट, नागरिकांना दिलासा, उल्हासनगरात भाजप व रिपाइं मोर्चाचे गोलमैदानात विसर्जन 

सदानंद नाईक 

उल्हासनगर : महापालिकेच्या आश्वासनानंतर भाजप-रिपाइं नेत्यांनी आयोजित केलेला मोर्चा गोल मैदानात विसर्जन केल्याची माहिती उपमहापौर भगवान भालेराव यांनी दिली. धोकादायक ११६ इमारतीचे स्ट्रॅक्टरल ऑडिट महापालिका करणार असून अन्य इमारतीच्या स्ट्रॅक्टरल ऑडिटसाठी १५ जनाचें सरंचनात्मक अभियंता पॅनेलची नियुक्ती करण्यात आले. तसेच विस्थापित होणाऱ्या नागरिकांची पर्यायी व्यवस्था केल्याची महिती महापौर लिलाबाई अशान यांनी दिली. 

उल्हासनगरात गेल्या महिन्यात मोहिनी पॅलेस व साईशक्ती इमारत दुर्घटनेचा धसका महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी घेऊन सरसगट १० वर्ष जुन्या तब्बल १५०० जुन्या इमारतींना स्ट्रॅक्टरल ऑडिट करण्याच्या नोटिसा पाठविल्या, तसेच महापालिकेने जाहीर केलेल्या अतिधोकादायक यादीतील इमारतीवर पाडकाम कारवाई सुरू करून, काही इमारतीचे वीज व पाणी पुरवठा खंडित केला. याप्रकारने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले. पाडकाम कारवाईत इमारती मधून बेघर व विस्थापित होणाऱ्या नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था महापालिकेकडे नसतांना, कोरोना काळात शेकडो नागरिकांना विस्थापित करण्याचे कारण काय? असा प्रश्न विचारला गेला. तसेच आयुक्त डॉ राजा दयानिधी व महापौर लिलाबाई अशान याप्रकरणी टीकेचे धनी बनले. महापालिकेच्या एकूनच कारवाईच्या निषेधार्थ भाजप-रिपाईने एकत्र येत शुक्रवारी गोलमैदान ते प्रांत कार्यालय दरम्यान मोर्चाची हाक दिल्याने महापालिकेला जाग आली. 

भाजप-रिपाईच्या मोर्चाच्या पाश्वभूमीवर महापौर लिलाबाई अशान, आयुक्त डॉ राजा दयानिधी, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, मदन सोंडे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यानी गुरवारी बैठक घेवून अनेक निर्णय घेतले. ११६ धोकादायक इमारतीचे स्ट्रॅक्टरल ऑडिट महापालिका करणार, अन्य इमारतीच्या स्ट्रॅक्टरल ऑडिट साठी एकून १५ सरंचनात्मक अभियंत्यांची पॅनल तयार करणे, धोकादायक इमारती मधून विस्थापित झालेल्या नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून भिवंडी येथील टाटा निमंत्रण येथील ५०० प्लॉट तात्पुरते स्वरूपात घेऊन तात्पुरता निवासी निवारा केंद्र उभारणे, शाळा, मंदिर, समाजमंदिर आदी ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. धोकादायक व अनधिकृत बांधकामे नियमाधिन करण्याची प्रक्रिया सुरू करणे. असे आश्वासन लेखी स्वरूपात दिले. यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.

आयुक्तांना अतिविश्वास नडलाशहरातील इमारतीचा स्लॅब पडल्याच्या पाश्वभूमीवर आयुक्तांनी महापौर, उपमहापौर, आमदार, नगरसेवक यांच्यासोबत चर्चा न करता, १० वर्ष जुन्या १५०० पेक्षा जास्त जुन्या इमारतींना स्ट्रॅक्टरल ऑडिट करण्याच्या नोटिसा दिल्या. तसेच सन १९९४ ते ९८ दरम्यानच्या इमारतीचे सर्वेक्षण करून ५०५ इमारतींना १४ दिवसात स्ट्रॅक्टरल ऑडिटचे आदेश दिले. तर काही इमारतीचे पाणी व वीज पुरवठा खंडित करून इमारतीवर पाडकाम कारवाई सुरू केली. यामुळे नागरिकांसह राजकीय नेत्यांत रोष निर्माण झाला. आयुक्तांच्या अतिविश्वासामुळे ऐन कोरोना काळात शहरात ही परिस्थिती ओढविल्याची टीका सर्वस्तरातून होत आहे.