विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी नोटीस बजावली होती. फडणवीसांना पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस यांना पोलीस ठाण्यात येण्याची गरज नाही आम्ही त्यांच्या सागर निवासस्थानी जाऊन चौकशी करणार असल्याचं पोलिसांनी सांगितल्याच समोर आले होते. देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या नोटीसचा निषेध करत राज्यभरात नोटीस होळी करण्यात आली.
ठाण्यात देखील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या व फडणवीसांना दिलेल्या नोटीस जाळण्यात आली. भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यावर आणि विधिमंडळात आंदोलन करणार असल्याचं सांगितलं. याच विषयावरून महाविकास आघाडी सरकारला घेरणार असून पेनड्राईव्हचा बॉम्ब बाहेर पडल्यामुळे विधानसभेत अनेकांच्या चेहरे पडले आहेत. अभी तो ये झाकी है और एक बॉम्ब बाकी है असं म्हणत भाजपा आमदार संजय केळकर यांनी सरकारला इशारा दिला आहे.