ठाणे : उपराष्ट्रपती हे घटनात्मक दृष्टीने महत्वाचे पद आहे. या पदाला मान व प्रतिष्ठा आहे. परंतु, कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी व तृणमुल कॉंग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी संसद भवनात उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड, यांचा अवमान केला, असा आरोप करीत त्याच्या निषेधार्थ ठाणे जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर भाजपाने आज आंदोलन छेडले.
येथील शासकीय विश्रामगृहा बाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी एकत्र येत या अवमानाच्या निषेधार्थ भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकत्यार्ंनी ठाण्यातील कोर्ट नाका येथे आंदाेलन केले. या वेळी राहुल गांधी, बॅनर्जी यांचा धिक्कार करण्यात आला. उपराष्ट्रपतींचा अवमान हा भारताचाच अवमान आहे. त्याबद्दल कॉंग्रेस, तृणमुल कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी माफी मागावी, अशी मागणी वाघुले यांनी केली. तर विरोधी पक्षांच्या नकारात्मक मानसिकतेवर केळकर यांनी टीका केली. उपराष्ट्रपतींना घटनात्मक दर्जा आहे. त्यांचा अवमान करण्याचे कृत्य निंदनीय आहे, असेही त्यांनी सांगितले.
या आंदोलनात माजी नगरसेवक नारायण पवार, संदिप लेले, मनोहर डुंबरे, मुकेश मोकाशी, सुनिल हंडोरे, माजी नगरसेविका सुवर्णा कांबळे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस मनोहर सुखदरे, सचिन पाटील, डॉ. समीरा भारती, ओबीसी मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस वनिता लोंढे, सचिव सचिन केदारी, सचिन आळशी, जिल्हा उपाध्यक्ष जयेंद्र कोळी, सागर भदे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहा पाटील, युवा मोर्चाचे अध्यक्ष सुरज दळवी, मंडल अध्यक्ष दिलीप कंकाळे, विकास घांग्रेकर, निलेश पाटील, सुदर्शन साळवी, सचिन भोईर, शिवाजी रासकर, कुणाल पाटील, किरण मणेरा, सुरेश पाटील, राकेश जैन, वसंत कराड, अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष शरीफ शेख, वृषाली वाघुले-भोसले, अर्चना पाटील, वर्षा पाटील, सुवर्णा अवसरे, श्रुतिका मोरेकर आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.