मुंबई: सरकाराला एखाद्या विषयाची माहिती दिली किंवा त्यांच्या चूक दाखविण्याचा प्रयत्न केला तर चूक दाखविणारा हा भाजपवाला असल्याचा शिक्का त्यावर मारला जात असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, उपचार सुरु असलेले 1 लाख 22 हजार रुग्ण आहेत. परंतु याचा डेटा तपासला गेला पाहिजे, या संदर्भातील जीआर काढला आहे, त्यात केवळ जे रुग्ण गंभीर स्थितीत आहेत, त्यांच्यासाठीच महात्मा फुले योजनेतून मदत असेच दिसत आहे. एकूण जर अॅक्टीव्ह पेशन्टची संख्या तेवढी दिसत नाही. परंतु क्रिटीकल रुग्णांची संख्या ही 1 लाख 22 हजार ही तेवढी झाली असेल असे दिसत नाही. त्यामुळे यामध्ये माहिती तपासली पाहिजे किंवा काही रुग्णालयांनी यासाठीचे रॅकेट तर तयार केलेले नाही, ना? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. त्यामुळे याची तपासणी केली पाहिजे. त्यामुळे टोपे यांनी केलेला हा दावा योग्य आहे, असे वाटत नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मराठा आरक्षणाचा विषय हा राजकारणापलीकडचा आहे, आमचे सरकार होते, त्यावेळेस आम्ही मराठा आरक्षणासाठी एक मोठी टीम तयार केली आहे. त्यानुसार डे टू डे बैठका त्यांच्या होत होत्या. न्यायालयाने एखादी माहिती मागितली तर ती 15 मिनिटात देण्याची तयारी देखील आमची होती. त्यामुळे आताच्या राज्य सरकाराने मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेऊन मराठा आरक्षण वाचविले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. आमच्या काळात सारथी संस्थांना आम्ही वाढविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आता खाजगी संस्थांना किल करण्याचे काम राज्य सरकार करीत असल्याची टीकाही त्यांनी केली. रेल्वे सुरु करण्यांसदर्भात रेल्वे प्रवासी संघाशी चर्चा करुन ऑफीसच्या वेळा आणि रेल्वेच्या वेळा यामध्ये समन्वय साधून त्या सुरु केल्या जाऊ शकतात व त्यातून ऑफीसच्या वेळाही निश्चित करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दिल्लीने कोरोना बळी रोखलेदिल्लीत कोवीडच्या चाचण्या वाढवून मृत्युचे प्रमाण रोखण्यात त्यांना यश आले आहे. परंतु राज्य सरकारकडून कोवीडच्या चाचण्या कमी प्रमाणात केल्या जात आहेत. त्यामुळे संशयींत रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत, त्यासाठी अहवालाची वाट बघीतली जात असून त्यातूनच त्यांना वेळेत उपचार मिळत नाही, यातूनच मृत्युचे प्रमाण वाढत असल्याचा आरोपही त्यांनी केला. परंतु राज्यात कोरोना चाचणी वाढविणो गरजेचे आहे, जेणे करुन निदान होऊन रुग्णांना वेळेत उपचार मिळतील आणि मृत्युचे प्रमाणही रोखले जाईल. असेही त्यांनी सांगितले. परंतु इकडे सर्वाधिक चाचण्या केल्या जात असल्याचा दावा मुख्यमंत्री करीत आहेत, मग असे असतांना राज्य टेस्टींगमध्ये नवव्या क्रमांकावर कसे असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. कमी टेस्टींग दाखवून आकडेवारी लपविण्याचा प्रयत्न सुरु असून या उलट कमी चाचण्या करुन नागरीकांचा जीव धोक्यात घालण्याचाच हा प्रकार असल्याची टीकाही त्यांनी केली.
अन्य महत्वाच्या बातम्या...
ठरलं! 8 जुलैपासून हॉटेल्स - लॉज उघडणार, पण...; महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा
गृहमंत्र्यांनी पोलीस बदल्यांची मुख्यमंत्र्यांना कल्पनाच दिली नसेल; देवेंद्र फडणवीसांना वेगळीच शंका
लढाईला तयार रहा! PUBG चा नवा मॅप येड लावणार; उद्या मोठी अपडेट मिळणार
अशक्यच! 15 ऑगस्टपर्यंत कोरोनावरील लस येणार नाही; सरकारनेच केले स्पष्ट
धक्कादायक! मालकाकडून व्यवस्थापकाचे अपहरण; गुप्तांगामध्ये सॅनिटायझर स्प्रे केले
धक्कादायक! अविरत सेवा देणाऱ्या तब्बल 1302 रेल्वे कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांना कोरोनाची बाधा
शी जिनपिंग यांची खुर्ची धोक्यात? भारतीय जवानांच्या शौर्याची झळ बिजिंगपर्यंत