उल्हासनगर : राज्यातील एकून २४ लोकसभा मतदारसंघातील दौऱ्यात ४० हजार नागरिकांसोबत थेट संवाद साधला असता त्यापैकी १६ नागरिकांनी मोदी याना नकार घंटा दिल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शहरात आयोजित केलेल्या जनसंवाद यात्रेत दिली. तसेच काँग्रेस सनांतन धर्म संपायला निघाल्याचे सांगून तुम्हाला हे मान्य आहे का? असा प्रश्न उपस्थित नागरिकांना केला.
देशात पुन्हा पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी येण्यासाठी भाजपने रविवारी शहरात जनसंवाद यात्रेचे आयोजन केले. उल्हासनगर, कल्याण पूर्व व अंबरनाथ या तीन मतदारसंघातील बूथ वारीयर्स यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मार्गदर्शन केल्यानंतर, कॅम्प नं-१, जुना बस स्टॉप या परिसरात जनसंवाद यात्रेचे आयोजन केले होते. यावेळी भाजी मार्केट मधील नागरिक, दुकानदार अश्या एकून १ हजार ८३ नागरिकांसी संवाद साधल्याचे बावनकुळे म्हणाले. तर एकून २४ लोकसभा मतदारसंघातील ४० हजार नागरिकां सोबत संवाद साधला असता त्यापैकी १६ जणांनी मोदींना नकार घंटा दिल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
काँग्रेस पक्षाचे गेल्या ६५ वर्षाचे पाप धुवून काढण्याचे काम भाजप करीत असून काश्मीरचे कलम-३७० रद्द करण्याची हिंमत दाखविली. त्यामुळे गेल्यावर्षी १ कोटी ३२ लाख नागरिक काश्मीर मध्ये जाऊन आले. त्यापूर्वी १८ लाख जात होते. कोरोनाची लस देवून नागरिकांचे जीव वाचविले असून फेब्रुवारी महिन्यात अयोध्यातील राममंदिर खुले होणार असल्याचे सांगितले. नागरिकांच्या विकासासाठी विविध ९५ प्रकारच्या योजना, विश्वकर्मा योजना, ३३ टक्के महिलांना लोकसभा व विधानसभेत आरक्षण देण्यात आले असून मराठा आरक्षणाबाबत भाजप आग्रही असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
अयोध्याला घेऊन जाण्याचे आश्वासन
अयोध्या मंदिर फेब्रुवारी महिन्यात खुले होणार असून उल्हासनगवासीयांना एसी रेल्वे गाडीत घेवून जाणार असल्याचे आश्वासन बावनकुळे यांनी आमदार कुमार आयलानी, शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांच्या वतीने दिले.
लोकसभेत १९१ महिला खासदार?
लोकसभा व विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण मोदी सरकारने दिल्याने, येणाऱ्या लोकसभेत १९१ महिला खासदार तर १०० महिला आमदार सन-२०१९ नंतर राहणार निवडून येणार असल्याची बावनकुळे म्हणाले.
काँग्रेस सनातन विरोधी इंडिया आघाडीतील स्टॅलिन यांनी सनातन धर्माला किड्यां मुंग्यांसारख्या मारून टाकू असे वक्तव्य केले असून काँग्रेसही सनातन विरोधी असल्याचा हल्लाबोल प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केला.