शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

कल्याण पूर्वेत भाजपा खाते उघडणार?

By admin | Published: October 12, 2015 4:34 AM

कल्याण पूर्व भागातून भाजपाला या निवडणुकीत खाते उघडता येईल का? अशी चर्चा आहे. या भागात २०१० ते २०१५ या कार्यकाळात शिवसेनेचे

कोळसेवाडी : कल्याण पूर्व भागातून भाजपाला या निवडणुकीत खाते उघडता येईल का? अशी चर्चा आहे.या भागात २०१० ते २०१५ या कार्यकाळात शिवसेनेचे ११, मनसे ६, राष्ट्रवादी ५, काँग्रेस २ आणि अपक्ष १ असे बळ होते. त्यामध्ये काँग्रेसचे उदय रसाळ, राष्ट्रवादीचे विशाल पावशे व अपक्ष विक्रम तरे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे, तर राष्ट्रवादीच्या माधुरी काळे व निलेश शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. विशेष महत्त्वाचे म्हणजे अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार गणपत गायकवाड यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे संजीवनी प्राप्त झाल्याचा दावा भाजपा करते आहे. कल्याण पूर्वमधून वसंतराव सूर्यवंशी, रमाकांत उपाध्याय व ज्योती गाढवे तसेच नामदेव भोईर यांनी नगरसेवकपद भूषविले. मात्र, भविष्यात हा ठसा कायम ठेवता आला नाही. परिवहन समितीवर अविनाश निकम हे सदस्य होते, तर सध्या सुभाष म्हस्के हे सदस्य आहेत. गायकवाड यांच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. भाजपाचे अधिकाधिक लोकप्रतिनिधी निवडून आणण्याकरिता त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन दणक्यात केले. अपेक्षित शक्तिप्रदर्शनही झाले. कल्याणमध्ये पूर्वभागातून शिवसेनेने ३ महापौर दिले. त्यांच्याच काळात आनंद दिघे उड्डाणपूल, प्रल्हाद शिंदे उड्डाणपूल, स्कायवॉक, १०० फुटी रस्ता, वालधुनी थ्रू बोगदा व सिमेंटच्या रस्त्याचे प्रकल्प राबवले असल्याचे शिवसेनेचे पदाधिकारी सांगत आहेत. त्यामुळे कल्याण पूर्व मतदार शिवसेनेचाच प्राधान्याने विचार करतील, असे त्यांचे मत आहे. तर, भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार शिवसेनेच्या नियोजनशून्य कारभाराला लोक कंटाळले असून ते या वेळेस सत्तापरिवर्तन निश्चित घडवणार आहेत.कल्याण पूर्वमधील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्यावर अपात्रतेच्या कायद्याचा बडगा उगारला गेला आहे, तर अभ्यासू नगरसेवक उदय रसाळ यांच्या मते संख्या वाढेल, असे चित्र नाही. तर, राष्ट्रवादी पक्षाचे विशाल पावशे भाजपामध्ये मागील विधानसभा निवडणुकीत गेले व निलेश शिंदे, माधुरी काळे शिवसेनेत गेले. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी यांचे अस्तित्व पूर्वमध्ये नगण्य झाले असून मनसेचे गड शाबूत राहणार की नाही, अशी शंका आहे. भाजपाला नव्याने कर्तबगार कार्यकर्ते निवडण्याची संधी आहे, तर शिवसेना त्याच चेहऱ्यांना संधी देऊ पहाते आहे.(वार्ताहर)