- मुरलीधर भवार
डाेंबिवली - बंड करणारे तीन आमदार ठाणे जिल्ह्यातील आहे. यातील एकाला पालकमंत्री केले असते तर लोकांची कामे झाली असती असा टोला राषट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी शिंदे गटाला लगावला आहे. जिल्ह्यातील तीन विधानसभा जागेवर भाजपचा डोळा आहे. आत्ता कल्याण पश्चिमेतील शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांचे काय होणार शेवटी शिवसेनेशी बंड करुन आमचा मतदार संघ आमच्या ताब्यात राहतो की नाही असा प्रश्न बंडखोर आमदारांना पडला आहे असाही चिमटा तपासे यांनी काढला आहे.
डोंबिवलीत एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते आणि प्रवक्ते तपासे उपस्थित होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर मत व्यक्त केले आहे. राज्यातील सांस्कृतिक विभागाने हॅलो ऐवजी वंदे मातरम्चे बोला असे आदेश काढले आहे. हे काही नवीन नाही. ग्रामीण भागात लोकं बोलतात. आम्ही फार मोठे देशभक्त आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न काही पक्ष करीत आहेत. कोणतीही गोष्टीत दबावाने आणि स्वयंस्फूर्तीने झाली पाहिजे याकडे तपासे यांनी लक्ष वेधले आहे. शंभराजे देसाई यांना ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिल्यावर तपासे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जरी ठाणे जिल्ह्यात राहणारे असले तरी त्यांचे मूळ गाव हे सातारा जिह्र्यात आहे. शंभूराजे देसाई हे देखील सातारा जिह््याचे असल्याने कदाचित आपल्या गावचा एक सहकारी म्हणून त्यांना ठाणे जिल्हा पालक मंत्री पदाची जबाबदारी दिली असेल. दुख एकच वाटते. बंड करण्यात ठाणे जिल्ह्यातील प्रताप सरनाईक, बालाजी किणीकर आणि विश्वनाथ भोईरत आहेत. यांच्यापैकी एका पैकी कोणाला ठाणे जिल्हा पालकमंत्री पदाचा जबाबदारी दिली असती तर कल्याण डोंबिवलीचा चांगला विकास झाला असता असे तपासे यांनी सांगितले.
इतकेच नाही तर प्रताप सरनाईक आणि शिंदे यांच्या नाराजी आहे. त्यावर तपासे यांनी सांगितले की, भाजप हा शिंदे गटाचा राजकीय उपयोग करुन घेत आहे. ते जवळपास महाराष्ट्रातील सर्व नागरीकांना माहिती आहे. ज्यांनी बंड केले त्या 40 पैकी आमदारांना माहिती आहे की, पुढच्या वेळेस त्यांना काही ना काही त्रसा सामोरे जावे लागेल. भाजप डोळा ठाणे जिल्ह्यातील ओवळा माजिवडा, कल्याण पश्चिम आणि अंबरनाथ विधानसभा मतदार संघावर आहे. त्याच्यामुळे आमदार प्रताप सरनाईक आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात वादाची ठिणगी पडली. जो ईडीचा क्लोजर रिपोर्ट सरनाईक यांच्या संदर्भात दाखल झाला होता. तो पुन्हा उघडकीस आणला जातो की काय अशी चर्चा सरेआम सुरु झालेली आहे.