शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

उल्हासनगरात भाजपाच्या सत्तेला ओमींचा हादरा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 3:16 AM

ज्या ओमी कलानी टीमच्या मदतीमुळे उल्हासनगर पालिकेत भाजपाची सत्ता आली. त्याच ओमी आणि त्यांच्या टीमची कोंडी करत त्यांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे उघड प्रयत्न भाजपातील एका गटाने सुरू केले

उल्हासनगर : ज्या ओमी कलानी टीमच्या मदतीमुळे उल्हासनगर पालिकेत भाजपाची सत्ता आली. त्याच ओमी आणि त्यांच्या टीमची कोंडी करत त्यांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे उघड प्रयत्न भाजपातील एका गटाने सुरू केले असून महापौरपद, स्थायी समितीपाठोपाठ आता प्रभाग समित्यांच्या निवडणुकीतूनही त्यांना हद्दपार करण्याची व्यूहरचना पूर्ण झाली आहे. त्यामुळे नाराज असलेला ओमी गट भाजपातून बाहेर पडण्याचा विचार करत असून तसे झाले तर तो भाजपासाठी मोठा हादरा असेल. वेगवेगळ््या तडजोडी करत कशीबशी हाती आलेली उल्हासनगरची सत्ता पक्षातील असंतुष्ट आणि पदांसाठी, आर्थिक लाभांसाठी कोणत्याही थराला जाण्याच्या तयारीतील साई पक्षामुळे घालवण्याची वेळ आली; तर लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांचे परिणाम भाजपाला भोगावे लागण्याची चिन्हे आहेत.त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नावापुरत्या असलेल्या ज्योती कलानी यांनीही बंडाचे निशाण फडकावले असून पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराऐवजी बंड करून ओमी कलानी गटाला जाऊन मिळालेल्या आपल्या निष्ठावंताचा सत्कार करून त्यांनीही राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याची तयारी पूर्ण केली आहे. त्यामुळे उल्हासनगरच्या राजकारणातील कलानी-आयलानी संघर्ष तीव्र होऊ लागल्याची लक्षणे दिसून लागली असून राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची शिष्टाईही असफल ठरल्याचे दिसून येत आहे.उल्हासनगर महापालिकेत भाजपाने शिवसेनेच्या सहकार्याने दशकभर सत्ता उपभोगली. मात्र त्यांना महापौरपद मिळाले नाही. त्या महापौरपदासाठी महापालिका निवडणुकीत भाजपाने शिवसेनेऐवजी ओमी कालानी टीमसोबत हातमिळवणी केली. ओमी टीमच्या मदतीमुळे कधी नव्हे ते भाजपाचे ३३ नगरसेवक निवडून आले. त्यानंतर सत्तेसाठी जवळ आलेल्या साई पक्षाने पाठिंब्याच्या बदल्यात पालिकेच्या अर्थकारणावर ताबा मिळवत, जुने हिशेब चुकते करत ओमी टीमला खड्यासारखे बाजूला ठेवण्यात भाजपातील असंतुष्टांना मदत केली. सत्ता समीकरणात सव्वा वर्षानंतर ओमी कलानी टीमला मिळणारे महापौरपदही आता मिळते की नाही, याबाबत शंका आहेत.या टीमला पहिल्या वर्षी कोणतेच मोठे पद मिळू दिले गेले नाही. त्यामुळे नाराज ओमी टीममधील धग शिवसेनेने जिवंत ठेवली. प्रभाग समित्यांसाठी त्यांना मदत केली. आताही प्रभाग १७ च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील लढत प्रतिष्ठेची करून त्यात ओमी यांना गुंतवून ठेवत भाजपाच्या जया माखिजा यांना स्थायी समिती सभापतीपदी निवडून आणले. प्रभाग समिती तीन आणि चारच्या सभापतीपदी शिवसेना व साई पक्षाचे उमेदवार बिनविरोध निवडून येतील, यासाठी पाठिंबा दिला. पण ओमीटीम- भाजपाचे वर्चस्व असलेल्या प्रभाग समिती एक- दोनमधील सभापदीपदाची निवडणूक बिनविरोध होऊ दिलेली नाही. भाजपाने ओमी टीमविरोधात उमेदवार रिंगणात उतरवून त्यांची कोंडी केली.>ज्योती यांचेही पक्षाला इशारेराष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष पदावर असलेल्या आमदार ज्योती कलानी यांनी शनिवारी पक्षाच्या विजयी नगरसेवक सुमन सचदेव यांच्याऐवजी पक्षात बंडखोरी केलेले कलानीनिष्ठ नगरसेवक सतरामदास जेसवानी यांचा सत्कार केला. या प्रकारामुळे ज्योती या कागदोपत्री राष्ट्रवादीत असल्या, तरी भाजपाचे उमेदवार कुमार आयलानींविरोधात विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी कलानी कुटुंबीय तयारीला लागल्याचे त्यातून स्पष्ट झाले. राष्ट्रवादीचे गटनेते भरत गंगोत्री यांनी आमदार व शहराध्यक्ष ज्योती कालानी यांच्यावर कारवाईची मागणी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे.स्वबळाची सत्ता पणालासत्ता मिळाल्यानंतर भाजपा नेत्यांकडून ओमी टीमचे पद्धतशीर खच्चीकरण सुरू असल्याने भाजपा हा आपल्या गरजेपुरता मित्र पक्षांचा वापर करणारा पक्ष असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. खास करून सिंधी समाजातील कलानी यांचा पाठीराखा मानला गेलेला गट अस्वस्थ आहे.ओमी यांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे प्रयत्न असेच सुरू राहिले, तर त्यांचा गट भाजपातून फुटून बाहेर पडू शकतो. तसे झाले तर तो भाजपाला मोठा धक्का असेल. विशेषत: शत-प्रतिशतचे नारे देताना याचे उत्तर पक्षाला द्यावे लागेल.‘ओमी यांनी कृती करावी. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत,’ असे सांगत शिवसेनेने यापूर्वीच आपले पत्ते उघड केले आहेत. जर या पद्धतीने सत्तापालट झाला आणि पदे मिळणार असतील, तर शिवसेनेसोबत असलेले इतर पक्षही त्यांच्यासोबत जाण्याची चिन्हे आहेत.भाजपातील कलानीविरोधक आणि साई पक्षाची मात्र या घडामोडींत प्रचंड कोंडी होईल. शब्द देऊनही पक्षातील एखाद्या गटाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा परिणाम काय होऊ शकतो, याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर