शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
4
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
6
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
7
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
8
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
9
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
10
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
11
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
12
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
13
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
15
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
16
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
18
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
20
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

पाटील यांची बंडखोरी शमवण्यात भाजपला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 12:54 AM

सशर्त माघार : मुख्यमंत्री, कपिल पाटील, किसन कथोरे यांची मध्यस्थी

मुरलीधर भवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विश्वनाथ पाटील यांनी काँगे्रसविरोधात बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांची बंडखोरी ही केवळ काँग्रेससाठी डोकेदुखी ठरणार नव्हती, तर कुणबीसेनेचे प्रमुख असल्याने ते कुणबी मते घेऊन भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांचाही विजयरथ रोखण्याची शक्यता होती. हा धोका ओळखून पाटील यांची बंडखोरी भाजपने शमवली आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांनी पुढाकार घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्या पुढाकारापश्चात पाटील यांनी काही अटींवर उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची माहिती आहे.

विश्वनाथ पाटील यांनी २००९ साली लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना ८९ हजार मते पडली होती. ही मते कुणबीसेनेच्या जोरावर त्यांनी घेतली होती. २०१४ साली त्यांनी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी लढवली. तेव्हा त्यांना तीन लाख मते मिळाली होती. ही मते केवळ काँग्रेसची नव्हती, तर त्यामध्ये कुणबी मतांचाही समावेश होता. यावेळी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसह कपिल पाटील यांच्याशी जवळीक साधली. त्यांची मुंबईत भेटही झाली. भेटीपश्चात विश्वनाथ पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज भाजपच्या सांगण्यावरूनच दाखल केल्याची चर्चा काँग्रेसकडून व्यक्त केली गेली; मात्र प्रत्यक्षात त्यांची उमेदवारी भाजपसाठीही अडचणीची ठरू शकत होती. कुणबी समाजाचा मतदार हा सामाजिक बांधीलकी म्हणून कुणबीसेनेच्या उमेदवाराकडे वळला असता आणि त्याचा फटका भाजपला बसला असता.

विश्वनाथ पाटील हे भाजपच्या संपर्कात असल्याने त्यांची बंडखोरी शमवण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला नाही. कल्याण, भिवंडी, मुरबाड, शहापूर आणि वाडा परिसरांत वर्चस्व असलेले भाजप आमदार कथोरे यांनी त्यांच्याशी प्राथमिक चर्चा केली. कथोरे यांनी पाटील यांच्यासमवेत गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक घेतली. यावेळी कपिल पाटील हेदेखील उपस्थित होती.यावेळी विश्वनाथ पाटील यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा झाली. त्यांच्या मागणीप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे ठाणे व कोकण परिसरातील सिंचनासाठी निधी देण्याचे, कुणबी आर्थिक विकास महामंडळास निधी देण्याचे आणि विधान परिषद व राज्यसभेत कुणबीसेनेला प्रतिनिधित्व देण्याचे आश्वासन दिले. पेसा कायद्यातील आरक्षणाचा विचार करण्याचेही आश्वासन त्यांनी दिले. आपण मांडलेल्या मुद्यांवर मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केल्याने अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे.पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन महायुतीला कुणबीसेनेचा पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी महायुतीत कुणबीसेना घटक पक्ष असेल, अशी मान्यता कुणबीसेनेला दिली आहे. कुणबीसेनेचा पाठिंबा राज्यभरातील सर्व महायुतीच्या उमेदवारांना असेल, असे पाटील यांनी सांगितले.कपिल पाटील यांच्यासह राज्यभरातील महायुतीच्या उमेदवारांना कुणबीसेनेने पाठिंबा दिल्याने विश्वनाथ पाटील यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे.

टॅग्स :bhiwandi-pcभिवंडी