डोंबिवली : ईव्हीएमविरोधात शुक्रवार, २० सप्टेंबरला विद्यार्थी भारती संघटना राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये ‘काळा दिवस’ पाळणार आहे, अशी माहिती संघटनेच्या अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी दिली.मतदानासाठी ईव्हीएम मशीन वापरण्याच्या विरोधात अनेक दिवसांपासून नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. मात्र, तरीही निवडणूक आयोग या गोष्टीला क्लीन चिट देते आहे. अनेक देश अजूनही मतदानासाठी मतपत्रिकांचा वापर करतात. जपानमध्ये ईव्हीएम मशीन असतानाही मतपत्रिकांचा वापर केला जातो, या गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना किंवा कुठल्या सभेला गेल्यावर ईव्हीएम वापरण्याच्या विरोधात बोलत असत. ईव्हीएम देशासाठी घातक आहे. ती देशाचा नाश करेल, असे त्यांचे मत होते. मात्र, तेच आता ईव्हीएम मशीनच्या बाजूने बोलत आहेत. आता देशाचा नाश झाला आहे. अजून नाश होईल, अशी चिन्हे दिसत नाहीत का, असा सवाल संघटनेचे राज्य प्रवक्ते अर्जुन बनसोडे यांनी केला आहे.ईव्हीएम लोकशाहीचा खून करत आहे. मात्र, लोकांना त्यांचे मत नीट कळत नाही. आता यावर आवाज उठवून आपली लोकशाही वाचवण्याची गरज आहे. यासाठीच ‘विद्यार्थी भारती’च्या राज्य संघटकांनी सर्व विद्यार्थ्यांना काळे कपडे परिधान करून ईव्हीएम मशीनचा निषेध नोंदविण्याचे आवाहन केले आहे.
‘ईव्हीएम’विरोधात आज काळा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 1:15 AM