शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

कामगारांची पिळवणूक करणाऱ्या शौचालय ठेकेदारास काळ्या यादीत टाकून गुन्हा दाखल करा, भाजपाची मागणी

By धीरज परब | Published: January 05, 2023 6:44 PM

सदर कंत्राटदाराला मजूर - सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी ३० हजार तर पर्यवेक्षकासाठी ३५ हजार रुपये पालिका देते.  परंतु कंत्राटदार मात्र केवळ ३ हजार ते ९ हजार एवढेच वेतन कर्मचाऱ्यांना देतो. सदर बाब सुद्धा उघडकीस आली आहे.

मीरारोड - महापालिकेकडून कामगारांच्या नावे पूर्ण पैसे घेऊन कामगारांना मात्र नाममात्र वेतन देत त्यांची पिळवणूक करणाऱ्या शौचालय ठेकेदारास काळ्या यादीत टाकून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अॅड रवी व्यास यांनी केली आहे.

मीरा भाईंदर महानगरपालिकेने शहरातील  सार्वजनिक शौचालयांची देखरेख व स्वच्छता करण्याचे काम मे 'शाईन मेंटेनन्स अँड सर्विस' या ठेकेदार संस्थेला दिले होते. ठेक्याचा करार महापालिकेने २०२० सालात केला होता. मात्र ठेकेदाराने शौचालयांची देखभाल दुरुस्ती व स्वच्छता करण्यात चालवलेला अक्षम्य हलगर्जीपणा तसेच सफाई कामगारांना किमान वेतन न देता नाममात्र वेतन देणे आदी प्रकारच्या तक्रारी मुळे पालिकेने त्याचा करार रद्द केला. मात्र पुढील व्यवस्था होईपर्यंत म्हणत पालिकेने काम मात्र त्याच वादग्रस्त ठेकेदाराच्या मार्फत सुरू ठेवले.

सदर कंत्राटदाराला मजूर - सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी ३० हजार तर पर्यवेक्षकासाठी ३५ हजार रुपये पालिका देते.  परंतु कंत्राटदार मात्र केवळ ३ हजार ते ९ हजार एवढेच वेतन कर्मचाऱ्यांना देतो. सदर बाब सुद्धा उघडकीस आली आहे.

 त्यामुळे कामगाराचा छळ करणाऱ्या या कंत्राटदारांवर पालिकेने फौजदारी गुन्हा दाखल करून त्यास काळ्या यादीत टाकण्याची मागणी मीरा भाईंदर भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड रवी व्यास यांनी महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांना पत्र देऊन केली आहे. 

 या गैरव्यवहारात समाविष्ट असलेल्या अधिकाऱ्यांची व ठेकेदाराची आर्थिक गुन्हे शाखा तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागा मार्फत चौकशी करण्यात यावी अन्यथा भाजपा आंदोलन करेल असा इशारा व्यास यांनी दिला आहे.   

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकBJPभाजपा