मुरबाड : मुरबाडपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कोलठण येथे अनेक महिन्यांपासून बेकायदा खडी मशीनचे काम सुरू होते. या भागातील डोंगर ब्लास्टिंग करून काढले जात होते. मंगळवारी दुपारी उच्च दाबाच्या जोरदार ब्लास्टिंगमुळे कोलठण गावातील ठाकरेनगरच्या ८० घरांना तडे गेले आहेत.
कानठळ्या बसवणाऱ्या या आवाजामुळे कोलठण गावातील सुमारे पन्नासपेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले असून अनेक घरांच्या भिंती, कॉलम, छपरे कोसळली आहे. निलेश सांबरे यांच्या मालकीच्या खदाणीत हे ब्लास्टिंग झाले. ती बेपरवाना असल्याचे समोर येत आहे.गावकºयांनी या घटनेची भीती व्यक्त करत होणाºया भीषण परिणामांची पूर्वकल्पना पत्राद्वारे ठाणे जिल्हाधिकारी, मुरबाड तहसीलदार, ग्रामपंचायत, पंचायत समिती, तलाठी तसेच सर्कल यांना दिली होती. मात्र, याबाबत कोणत्याही स्वरूपाची कारवाई न झाल्याने हा प्रकार घडल्याचे पीडित गावकºयांनी सांगितले आहे. तर, गावकºयांच्या जीवाशी खेळणारे खडी मशीनमालक आणि त्यांना सहकार्य करणाºया संबंधित अधिकाºयांवर फौजदारी कारवाई व्हावी, अशी गावकºयांची मागणी आहे. या घटनेला जबाबदार असणारे क्रशरमालक आणि संबंधित अधिकारी यांच्यावर फौजदारी कारवाई व्हावी, अशी मागणी माजी जि. प. सदस्य तुकाराम ठाकरे यांनी केली आहे.सदर स्टोन क्र शरला प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी दिलेली नाही. तरी, त्यांनी तो अनधिकृतपणे सुरू केला. यात ७० ते ८० घरांचे नुकसान झाले असून सुमारे ५० घरांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. चौकशीअंती पुढील कारवाई केली जाईल. निलेश सांबरे यांच्याकडे खदाणीसंबंधांतील कागदपत्रांची मागणी केली असल्याचे पत्र क्रशरच्या सुरक्षारक्षकाकडे दिले असून त्याचे उत्तर सांबरे यांनी दिलेले नाही.- दत्तात्रेय मोरे, मंडळ अधिकारी, मुरबाडकोलठण गावात सुरुंग स्फोटाने हाहाकार माजला असून याबाबत आपल्या दगडखाणीचा किंवा क्रशरचा काही संबंध आहे का, याबाबत विचारणा करण्यासाठी निलेश सांबरे आणि त्यांचे खाजगी सचिव हरेश पष्टे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.