- प्रज्ञा म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जन्मत:च अंधत्व असलेल्या श्वानाच्या दोन पिल्लांना अखेर कुटुंबाचा आधार मिळाला. अमेरिकेतील भारतीय वंशाच्या एका महिलेने दोन दृष्टिहीन कुत्र्यांच्या पिल्लांना दत्तक घेण्यास पुढाकार घेतला आहे. त्यामुळे ठाणे शहरातील ही पिल्लं डिसेंबरमध्ये अमेरिकेत बोस्टन येथे जाणार आहेत. या पिलांना दत्तक घेण्यासाठी कॅप फाउंडेशनने आवाहन केल्यानंतर अमेरिकेतून प्रतिसाद मिळाला. या आवाहनासाठी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिनेदेखील सहकार्य केले होते. बिटा आणि गामा अशी या दोन पिलांची नावे आहेत.
मुसळधार पावसात मादी श्वान आणि तिची पिल्ली अडकून पडली होती. कॅप फाउंडेशनने त्यांना जीवदान दिले होते.
पिलांना पाठविण्याआधी ...या पिलांना पाठविण्याआधी त्यांचे लसीकरण आणि रक्त तपासणी होऊन रक्त इंग्लंड येथे टायटन तपासणीसाठी पाठविले जाणार आहे. त्याआधी २८ ऑगस्ट रोजी त्यांना रेबीज दिले जाणार आहे. अहवाल आल्यावर त्यांचे पासपोर्ट, व्हिसा आणि मायक्रो चीप केले जाणार आहे. सध्या त्यांची इथे विशेष काळजी घेतली जात आहे.
योलो आणि कॅप यांच्या सहकार्याने या दोन श्वानांना १८ डिसेंबर रोजी अमेरिकेत पाठविले जाणार आहे. ही प्रक्रिया खूप प्रदीर्घ असल्याने काही तपासण्या आणि कागदपत्रांची कार्यवाही करणार आहोत. - सुशांक तोमर, अध्यक्ष, कॅप संस्थापक