शहरं
Join us  
Trending Stories
1
लेक लाडकी योजनेचे काय झाले? तुम्ही केलेले काम लोक विसरले वाटतेय का; वर्षा गायकवाडांचा शिंदेंना टोला
2
संत ज्ञानेश्वर महाराजांचा प्रस्थान सोहळा संपन्न; उद्या सकाळी आजोळघरातून होणार प्रस्थान
3
“काँग्रेसला जमत नाही म्हणून भाजपा-शिंदे गट सत्तेत आहे”; बच्चू कडूंचा खोचक टोला
4
“लोकसभेत धसका, आता विधानसभेला आग्रहाची विनंती आहे की...”; शरद पवारांचे PM मोदींना साकडे!
5
माझं मन सांगतंय दक्षिण आफ्रिका जिंकायला हवी, पण...! Shoaib Akhtar चं फायनलपूर्वी मोठं भाकित
6
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर; माता भगिनींनी CM एकनाथ शिंदेंना बांधल्या राख्या
7
कर्नाटक काँग्रेसमध्ये कलह! मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांमध्ये वाद?; डीके शिवकुमार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या 'या' सूचना
8
"अतिरिक्त अर्थसंकल्पाला मान्यता नसताना जीआर काढणे हा हक्कभंग’’, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप 
9
भाजपातून जदयूत आले, नितीशकुमारांनी पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष केले; उत्तराधिकारी की...?
10
बाईकची चाचणी देऊन मिळवलं क्रेन चालवण्याचे लायसन्स; अंधेरी RTO च्या भ्रष्टाचावरुन वडेट्टीवारांचे ताशेरे
11
"आपल्याकडे हिरो ठरवतो सिनेमाची हिरोईन", संस्कृती बालगुडेनं सांगितलं सिनेइंडस्ट्रीतील धक्कादायक वास्तव
12
सशक्त पक्षसंघटना, मोदी, योगींची लोकप्रियता, तरीही UPमध्ये भाजपाचा पराभव का झाला? अहवालातून धक्कादायक माहिती समोर 
13
“लोकसभेत १५५ विधानसभा मतदारसंघात भाजपा पराभूत, इथे सत्ता बदलणारच...”: शरद पवार
14
भारतीय संघाकडून दक्षिण आफ्रिकेची बेक्कार धुलाई; क्रिकेट विश्वात नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड
15
पुण्यातील पब्स आणि बारवर महापालिकेची कारवाई, मराठी अभिनेता म्हणतो- "इतकी वर्ष मोकाट चालू दिलं..."
16
काय हे आयसीसी...! विजेत्या संघाला किती बक्षीस मिळणार? IPL पेक्षा काही लाखच जास्त...
17
बुलडोझर बाबाचा बुलडोझर गरीब आणि मागासवर्गीयांवर का? पवईतील अतिक्रमण कारवाईवरुन विजय वडेट्टीवार आक्रमक
18
पेपरफुटीविरोधात राज्य सरकार कडक कायदा करणार का? नाना पटोले यांचा सवाल
19
छोट्या गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी, SEBI नं डीमॅट अकाऊंटच्या लिमिटमध्ये केले बदल
20
गजकेसरी योग: ८ राशींना लाभच लाभ, भाग्याचा काळ; यश-प्रगती, पदोन्नती-नफा कमवायची संधी!

नेत्रदानाबाबत अद्यापही अंधश्रद्धा, डॉ. तात्याराव लहानेंना खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2019 3:20 AM

डॉ. तात्याराव लहाने : सिंधुताई सपकाळ यांना जीवनगौरव पुरस्कार

ठाणे : नेत्रदानात आपण खूप मागे आहोत. महाराष्ट्रात २५ हजार, तर भारतात २२ लाख जणांना डोळ्यांची गरज आहे. श्रीलंकेत एक लाख लोक मृत्यू पावले, तर दोन लाख डोळे मिळतात. आपल्याकडे नेत्रदानाबाबत अंधश्रद्धा आहे. नेत्रदान, अवयवदान करा आणि हे करून तुम्ही सर्वांचे आई व्हा, असे आवाहन नेत्ररोगतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी रविवारी ठाण्यात केले.

जागर फाउंडेशन आयोजित जागर गौरव सोहळा रविवारी गडकरी रंगायतन येथे पार पडला. यावेळी डॉ. लहाने म्हणाले की, माणसाला मोठे होण्यासाठी संघर्ष करावा लागतो. संघर्षाशिवाय मोठे होता येत नाही. सामान्यातून मोठे होण्यासाठी संघर्ष करावा लागतो, असेही ते म्हणाले. जंकफूड आपल्या शरीरासाठी घातक आहे. आपल्या जिभेला लगाम घाला आणि जंकफूड टाळा. भाकरी, भाजी खा आणि भरपूर आयुष्य जगा, असा संकल्प या नवीन वर्षात करा. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी गोड पदार्थ टाळा. रोज व्यायाम करा. डोळ्यांच्या आरोग्यासाठी अ जीवनसत्त्वयुक्त पदार्थ खा. औषधे टाकल्याने डोळे खराब होतात. सकाळ-संध्याकाळ थंड पाण्याने डोळे धुवा. आपल्या पाल्यांचे डोळे आपण खराब करत आहोत. सहा वर्षांपेक्षा कमी वयाचा मुलगा रडू लागला की, त्याला शांत करण्यासाठी त्याच्या हातात पालक मोबाइल देतात. तो रडतो म्हणून मोबाइल देणे म्हणजे त्याच्या डोळ्यांचे नुकसान करणे. दिवसभर मोबाइल पाहिल्याने एक डोळा अधू होतो. घरात आल्यावर मोबाइल बंद करा, असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी आ. संजय केळकर यांना आदर्श आमदार, तर सिंधुताई सपकाळ यांना जागर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.उत्कृष्ट पत्रकार, नगरसेवक पुरस्कारलोकमत, ठाणेचे उपमुख्य उपसंपादक अजित मांडके यांना यावेळी उत्कृष्ट पत्रकार म्हणून गौरवण्यात आले. याचबरोबर पत्रकार निलेश पानमंद, प्रज्ञा सोपारकर यांनाही सन्मानित करण्यात आले. शैलेश पुराणिक आणि गडकरी कट्ट्याचे संचालक संजय पाटील यांना उद्योग गौरव पुरस्कार, डॉ. समीरा भारती, अर्चना पाटील, अ‍ॅड. चेतन पाटील यांना समाज गौरव पुरस्कार, डी.आर. जाधव यांना क्रीडा गौरव, कौस्तुभ तारसाळे यांना मरणोत्तर शौर्य, सुनील सिनलकर यांना ज्ञान गौरव, अशोक जिज्ञासी विशेष सेवा गौरव, भारतीय मराठा संघाला सेवाभावी संस्था, आदेश भगत, मनविसे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांना जनआंदोलक, डॉ. महेश बेडेकर यांना दक्ष नागरिक, मुंब्रा प्रभाग समितीला विशेष पुरस्कार, दिवा प्रभाग क्र. २७ ला अस्वच्छ प्रभाग पुरस्कार, सिद्धार्थ ओवळेकर, सुनीता मुंढे, सुनेश जोशी, नंदा पाटील, रागिणी बैरीशेट्टी, मालती पाटील यांना उत्कृष्ट नगरसेवक पुरस्काराने गौरवण्यात आले. 

टॅग्स :thaneठाणे