ठाणे : ठाणे शहरात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर २ ते १२ जुलैपर्यंत सुरु राहणाऱ्या लॉकडाऊनच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी पोलिसांनी ५५ ठिकाणी बॅरिकेडस् लावून नाकाबंदीचे पॉर्इंन्टस उभारले आहेत. अर्थात, धान्य, भाजीपाल्यासह ३३ प्रकारच्या अत्यावश्यक सेवांना यातून वगळल्यामुळे हा नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
ठाणे शहरासह कल्याण डोंबिवली तसेच संपूर्ण पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रातच २९ जून ते ३१ जुलै या कालावधीमध्ये पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मनाई आदेश लागू केला आहे. या आदेशाद्वारे सार्वजनिक कार्यक्रमांच्या आयोजनाला परवानगी नाही. याचबरोबर खासगी आणि एसटी महामंडळासह सार्वजनिक वाहतूक सेवा बंद राहणार आहे. शैक्षणिक संस्था, धार्मिकस्थळे आणि सायकलसह सर्वच वाहनांना तसेच प्रवासी वाहतुकीला बंदी घालण्यात आलेली आहे.नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार
- रात्री ९ ते सकाळी ५ वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी संचारबंदी आहे. किमान सहा फुटांचे सामाजिक अंतर आणि मास्क लावणे बंधनकारक असून मॉर्निंगसह इतर फेरफटक्यावरही बंदी आहे.
- हे मनाई आदेशातून वगळले : अंत्यविधी आणि लग्नसमारंभ (५० व्यक्ती), दूध, दुग्धोत्पादने, फळे आणि भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू, वैद्यकीय उपकरणे, बँकिंग सेवा अशा ३५ प्रकारच्या अत्यावश्यक सेवांना यातून वगळले आहे.
- दरम्यान, ठाणे महापालिका क्षेत्रात लागू केलेल्या लॉकडाऊनच्या अंबलबजावणीसाठी शहरातील प्रमुख रस्त्यांवर राज्य राखीव दलासह सुमारे दीड हजार पोलिसांची कुमक तैनात केली आहे. नियम मोडणाºयांना दंड आणि कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागणार आहे. त्यांच्यावर साथ प्रतिबंध कायद्यानुसार खटलेही दाखल केले जातील. लॉकडाऊन एकपेक्षाही अनलॉकनंतर जारी केलेला हा लॉकडाऊन कडक असणार आहे.
केडीएमसीत ६१ निवासी भाग सीलकल्याण, डोंबिवलीतील ६१ निवासी भाग सील केले असून नाकाबंदी कडक केली आहे. याठिकाणी पेट्रोलिंगसाठी ७५० पोलिसांची कुमक तैनात केली आहे.असे आहे पोलिसांचे सुरक्षाकवचआधीच्या लॉकडाऊनच्या काळात ठाण्यातील सुमारे ५०० पेक्षा अधिक पोलीस कोरोनामुळे बाधित झाले. त्यामुळे आता सुरक्षाकवचासह पोलिसांना फिल्डवर उतरविण्यात आले आहे. फेस मास्क, फेस शिल्ड, हॅण्डग्लोव्हज, सॅनिटायझरचा मुबलक पुरवठा केला असून सोशल डिस्टसिंग राखूनच कारवाईचे आदेश दिलेले आहेत.