ठाणे : मुंबई विद्यापीठाने आॅक्टोबर महिन्यात करण्यात येणारी प्रवेशप्रक्रिया बंद केली आहे. ती तत्काळ सुरू न केल्यास आगामी आठ दिवसांनंतर मुंबई विद्यापीठ आणि शिक्षणमंत्र्यांविरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शनिवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष मोहसीन शेख यांनी दिला. यासंदर्भात त्यांनी कुलगुरूंची भेट घेऊन त्यांना निवेदनही दिले.मुंबई विद्यापीठामध्ये दरवर्षी लाखो विद्यार्थी शिक्षण पूर्ण करून बाहेर पडतात. विद्यार्थ्यांच्या प्रवेशाकरिता मागील वर्षी जानेवारी २०१७ या महिन्यापर्यंत दोन वेळा मुदतवाढ दिली होती. त्याचा विद्यार्थ्यांनी शैक्षणिक लाभ घेतला. परंतु, यावर्षी २० आॅक्टोबर २०१८ रोजीच शैक्षणिक प्रवेश बंद केले आहेत. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी मोहसीन शेख यांनी आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र देऊन या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यासंदर्भात देऊन विद्यापीठ प्रशासनाने पुढील आठ दिवसांत याबाबत योग्य तो ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.>अभ्यासक्रम बंद केल्याने ६० लाखांचे नुकसान?मुंबई विद्यापीठाच्या संज्ञापन व पत्रकारिता विभागातर्फे पाच अभ्यासक्र म चालवले जातात. यापैकी मास्टर आॅफ आर्ट्स (इलेक्ट्रॉनिक मीडिया), मास्टर आॅफ आर्ट्स (टेलिव्हिजन स्टडीज) आणि मास्टर आॅफ आर्ट्स (फिल्म स्टडीज) हे अभ्यासक्र म एक वर्षासाठी बंद करण्याचा निर्णय विभागप्रमुखांनी घेतल्याचे समजते. त्यासंदर्भात नुकतेच विभागाने कुलगुरूंना पत्र लिहून याची कल्पना दिली आहे.हे अभ्यासक्रम चालवणारे मुंबई विद्यापीठ हे देशातील एकमेव विद्यापीठ आहे. ते बंद केल्यामुळे विद्यापीठाचे ६० लाखांचे नुकसान होणार आहे. या तिन्ही अभ्यासक्र मांमध्ये प्रत्येकी २० या प्रमाणे ६० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची सुविधा आहे. मात्र, ते बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. हे अभ्यासक्र मही तत्काळ सुरू करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
मुंबई विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांची नाकेबंदी, कुलगुरूंना दिले पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 1:22 AM