ठाणे : कोरोनाकाळात जाणवणाऱ्या रक्ताच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी सलून ब्युटीपार्लर असोसिएशन, ठाणे विभागातर्फे शनिवारी सावरकरनगर येथील सामाजिक सभागृह येथे रक्तदान तसेच आरोग्य तपासणी शिबिर पार पाडले. या शिबिरात सलून ब्युटीपार्लर चालक, कामगार आणि सलून व्यावसायिकांच्या कुटुंबीयांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले. या शिबिराला महापौर नरेश म्हस्के उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनला सलून, ब्युटीपार्लर असोसिएशनचे संपूर्ण सहकार्य आहे. परंतु, अनलाॅकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सलून, ब्युटीपार्लर व्यावसायिकांचा प्रथम प्राधान्याने विचार करावा, अशी मागणी असोसिएशनचे कायदेशीर सल्लागार ॲड. शैलेश कदम यांनी केली. या शिबिराला महाराष्ट्र सलून, ब्युटीपार्लर असोसिएशनतर्फे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय चव्हाण आणि महाराष्ट्र कमिटी तसेच इतर शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते.
-----------