अंबरनाथ : सलग ११ महिने रक्तदान शिबिरांमधून एक हजार ७० पिशव्या रक्त संकलित करणाऱ्या बदलापूर येथील काका गोळे फाउंडेशनने महिलांच्या रक्तदान शिबिराने या मोहिमेचा करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. रक्तदान चळवळीत महिलांचा सहभाग वाढावा, या हेतूने ३ ऑक्टोबरला हे विशेष शिबिर घेण्यात येणार आहे.
या शिबिरात फक्त महिला रक्तदान करणार असून, रक्तपेढ्यांमधील तंत्रज्ञ, कर्मचारी आणि डॉक्टरही महिला असणार आहेत. शिबिराची सर्व व्यवस्थाही महिला स्वयंसेवक पाहणार आहेत. सलग ११ शिबिरांप्रमाणेच खास महिला रक्तदान शिबिरालाही चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास फाउंडेशच्या संचालिका तनुजा गोळे यांनी व्यक्त केला आहे. या शिबिरात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे, यासाठी फाउंडेशनच्या पॅथॉलोजी लॅबमध्ये दररोज सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत महिलांसाठी विनामूल्य हिमोग्लोबीन तपासणी केली जाणार आहे.
---------