लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : ‘लोकमत’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘नातं रक्ताचं’ या रक्तदान शिबिरात शनिवारी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट, रोटरी क्लब ऑफ रिजन्सी इस्टेट, रोट्रॅक्ट क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट या संस्थांच्या ३८ रक्तदात्यांनी रक्तदान करत सामाजिक भान जपले.
पूर्वेतील एमआयडीसीमधील रोटरी भवनमध्ये हे शिबिर पार पडले. ‘ड्रॉप ऑफ होप’ या संकल्पनेतून त्याची अंमलबजावणी करण्यात आल्याची माहिती संयोजक रो. कौस्तुभ कशेळकर यांनी दिली. रो. समीर गायकवाड आणि रो. ऋषिकेश भागवत हे देखील त्यावेळी आवर्जून उपस्थित होते. चिदानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून रक्त संकलित करण्यात आले. या शिबिरात रक्तदात्यांची उपस्थिती लाभावी, यासाठी कारखानदारांच्या ‘कामा’ संघटनेच्या माध्यमातूनही सर्वांना आवाहन करण्यात आले होते. त्या संदर्भात सर्व संस्थांनी समाजमाध्यमांवर जनजागृती केली.
तिन्ही संस्थांनी रोटरीच्या माध्यमातून सगळ्या सदस्यांना या उपक्रमाची माहिती दिली होती. एकूण ४३ सदस्यांनी रक्तदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यापैकी ३८ जणांना रक्तदान करता आले. संयोजकांनी रक्तपेढी व लोकमत वृत्तपत्रसमूहाचे आभार मानले.
-----------