शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
3
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
4
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
5
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
6
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
7
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
9
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
10
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
11
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
12
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
13
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
14
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
15
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
16
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
17
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
18
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
19
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
20
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल

अत्याचारास विरोधामुळेच खून

By admin | Published: October 05, 2016 2:45 AM

लैेंगिक अत्याचाराला विरोध केल्यानेच कोपरी आनंदनगर येथील राखी शेजवळ (३०) या विवाहितेचा तिच्याच शेजारी राहणाऱ्या बाबू गोपाल गोगावले (२१) या तरुणाने खून केल्याचे उघड झाले आहे.

ठाणे : लैेंगिक अत्याचाराला विरोध केल्यानेच कोपरी आनंदनगर येथील राखी शेजवळ (३०) या विवाहितेचा तिच्याच शेजारी राहणाऱ्या बाबू गोपाल गोगावले (२१) या तरुणाने खून केल्याचे उघड झाले आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचने अवघ्या ४८ तासांमध्ये या हत्येचा छडा लावून त्याला अटक केली.राखी ही विवाहिता असूनही गेल्या सहा महिन्यांपासून बाबू तिच्या मागे लागला होता. काही दिवसांपूर्वीही त्याने तिची अशीच छेड काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याच्या आईवडिलांनी त्याला घणसोलीतील त्याच्या बहिणीकडे पाठविले होते. कोपरीत आई, वडील आणि भाऊ वास्तव्याला असल्यामुळे तो अधून मधून त्यांना भेटण्याच्या निमित्ताने यायचा. २ आॅक्टोंबरला दुपारी ती कामगार कल्याण केंद्रासमोरील घरात पाणी भरण्यासाठी शिरल्यानंतर तिच्या पाळतीवर असलेला बाबूही तिच्या मागोमाग घरात शिरला. त्यावेळी त्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करीत लगट करण्याचा प्रयत्न केला. तिने त्याचा हा प्रयत्न धुडकावल्याने आधीच तयारीने आलेल्या बाबूने तिच्या गळ्यावर चाकूने वार केले. यात ती तडफडत मरण पावल्याचे पाहिल्यानंतरच तिथून पळ काढल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. दरम्यान, जय (६) आणि पारस (५) ही तिची दोन्ही मुले आजीच्या घरुन आंघोळ करुन परतली. तेंव्हा, आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली त्यांना दिसली. त्यानंतर हा प्रकार उघड झाला. घटनास्थळी सापडलेला चाकू आणि आणि शेजाऱ्यांच्या चौकशीतून तिच्या शेजारी राहणारा बाबू हा त्यादिवशी घरीच होता, असेही तपासात उघड झाले. पोलीस पथकाने आजूबाजूच्या दहा ते १२ जणांची चौकशी केली. तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालातही तिने जोरदार प्रतिकार केल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. त्याचवेळी शेजारील बाबू हा वेगवेगळी उत्तरे देत असल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने अतिप्रसंगाला प्रतिकार केल्यानंतर चाकूने गळ्यावर वार करुन तिचा खून केल्याची कबुली दिली. तक्रार झाली असती तर...घाटकोपरच्या एका चॉकलेट कंपनीत डिलिव्हरी बॉयचे काम बाबू गोगावले करतो. रेखा यांच्या घराशेजारीच तो राहतो. यापूर्वीही त्याने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला होता. त्याचवेळी पोलिसांत तक्रार दाखल झाली असती तर कदाचित त्याची तिला मारण्यापर्यत मजल गेली नसती.प्रतिकाराने वाचा फुटलीगोगावलेने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिने त्याला जोरदार प्रतिकार केला. यात तिच्या बांगड्याही फुटल्या. तिने त्याला नखांनी ओरबाडले. त्याच्या अंगावरील ओरखड्यानेही या खूनाला वाचा फुटली.