शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

आधी निरूत्साह... नंतर वाढला टक्का!

By admin | Published: May 25, 2017 12:15 AM

गेल्या तीन दिवसांत वाढलेला उन्हाचा तडाखा, मे महिन्याच्या सुट्या आणि एकंदरीतच राजकीय वातावरणाबद्दल असलेला तिटकारा याचा परिणाम भिवंडीच्या मतदानावर दिवसभर दिसून आला

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी/अनगाव/ठाणे : गेल्या तीन दिवसांत वाढलेला उन्हाचा तडाखा, मे महिन्याच्या सुट्या आणि एकंदरीतच राजकीय वातावरणाबद्दल असलेला तिटकारा याचा परिणाम भिवंडीच्या मतदानावर दिवसभर दिसून आला. मतदारांतील निरूत्साह, तरूणांनी फिरवलेली पाठ, कामगार आणि मुस्लिम वस्त्यांतील शुकशुकाटामुळे भिवंडीच्या मतदानाचा टक्का संध्याकाळपर्यंत घसरलेला होता. प्रचारावेळी असलेल्या नैराश्याचे प्रतिबिंब मतदानातही पडले. संध्याकाळनंतर मात्र उमेदवार, नेते आणि कार्यकर्त्यांनी धावपळ करत मतदारांना बाहेर काढले आणि टक्का वाढवला. गेल्यावेळेपेक्षा सहा टक्के मतदान अधिक झाल्याचा प्राथमिक अंदाज येताच सर्व पक्षांनी हे वाढीव मतदान आमच्यासाठी झाल्याचा दावा सुरू केला.भिवंडीच्या ९० जागांसाठी हे मतदान झाले. त्याची मोजणी गुरूवारी होणार आहे. मतदारांच्या दुबार नावांचा विषय मतदानापूर्वी गाजलेला असल्याने अशा नावांवर उमेदवारांचे, बूथ प्रमुखांचे खास लक्ष होते. पण दुबार मतदानाच्या तक्रारी आल्या नाहीत. धक्काबुक्की, तणाव, बाचाबाचीचे किरकोळ प्रकार वगळता तुलनेने शांततेत मतदान पार पडले आणि ५५ टक्के मतदारांनी हक्क बजावल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला. प्रचारावेळीच मतदारांतील निरूत्साहाचे दर्शन घडले होते. तो निरूत्साह सकाळपासूनच मतदानात दिसून आला. उन्हाचा कडाका वाढण्यापूर्वी ज्येष्ठांनी, महिलांनी आजारी, अपंगांनी मतदान केले. पण टक्का अजिबात वाढत नव्हता. खास करून तरूण मतदारांनी पाठ फिरवल्याचे जागोजाग दिसून येत होते. दुपारी महिलांची संख्याही कमी होती. अनेक मतदारांच्या घरी स्लिपा न पोचल्याने मतदानाचा टक्का घसरल्याचा दावा उमेदवार, बूथवरील त्यांचे कार्यकर्ते करीत होते. मतदारांच्या जागृतीसाठी, मतदानाचा हक्क बजावावा, मतदानाचा टक्का वाढावा यासाठी अन्य पालिकांत जशी जागृती हाती घेण्यात आली होती, त्याचा अभाव भिवंडीत दिसून आला. त्याचाही परिणाम मतदानावर झाल्याचे दावे केले जाऊ लागले. ज्या मतदारांना नेहमीचे मतदानकेंद्र, बूथ ठावूक होता, ते वगळता उरलेले मतदार उतरलेच नाहीत. रावजीनगर, पद्मानगर, भंडारी कम्पाऊंड, अवचितपाडा, समदनगर, अशोकनगर, कोंबडपाडा, कामतघर नजराणा बाजारपेठ येथे रांगा दिसू लागल्या. दुपारपर्यंत पंचायत समिती कार्यालय, दांडेकरवाडी शाळा, रंगराव पवार विद्यालय, पद्मश्री अण्णासाहेब जाधव, चाचा नेहरू हिंदी स्कूल, बीएनएन कॉलेज येथे तर तुरळक मतदार पाहायला मिळत होते. मुस्लिम महिला मदतनीस : मोमीन गर्ल्स स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या ठिकाणी शिक्षिकाच मदतनीस म्हणून काम करत होत्या. मतदारांना माहिती देत होत्या. या कामासाठी तब्बल २८ शिक्षिकांचा ग्रूप तयार केला होता. त्यांना दोन तासांच्या ड्यूट्या देण्यात आल्या होत्या. या शाळेतील आणखी सहा महिलांना समदिया स्कूल येथेही ड्यूटीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती लिपिक अदील मुन्शी यांनी दिली. व्यापाऱ्यांशी बाचाबाचीमतदान वाढविण्यासाठी पोलिसांनी काही भागातील दुकाने बंद करण्यास दुकानदारांना भाग पाडले. त्यामुळे पोलीस आणि दुकानदारांमध्ये तुरळक प्रमाणात बाचाबाची झाली. निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत गस्त सुरू होती. केंद्रांवर गर्दी होऊ न देण्यावर पोलिसांनी भर दिला होता. पाण्यासाठी खास व्यवस्थामे महिना, त्यात उन्हाचा कडाका वाढल्याने प्रत्येक मतदानकेंद्राच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केलेली होती. 49टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत सहा टक्के मतदान अधिक झाल्याचा अंदाज आहे.दुबार मतदारांची पाठ : मतदारयादीत दुबार नावे असलेल्या मतदारांना ओळख पटवूनच मतदान करण्याच्या सूचना आधी दिल्या होत्या. बोगस मतदार आढळल्यास फौजदारी कारवाईचे आदेश आयुक्त योगेश म्हसे यांनी केंद्रप्रमुखांना दिले होते. परिणामी, अशा मतदारांपैकी अनेकांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचा दावा करण्यात आला. कामगार वस्त्यांतही शांतता : कामगार, झोपडपट्टी असलेल्या कोंबडपाडा, संगमपाडा, म्हाडा कॉलनी, भादवड टेमघर, शांतीनगर, नवीवस्ती, शास्त्रीनगर, पद्मानगर, कामतघर, फेणेपाडा, ताडाली या भागात दुपारपर्यंत निरूत्साह होता. उन्हामुळेही मतदार बाहेर पडले नव्हते. अखेर संध्याकाळनंतर तेथील टक्का वाढला. गावी गेलेले मतदार परतले : भिवंडीत राहणारी काही मंडळी कामानिमित्त बाहेरगावी गेली होती. यामध्ये बीड, उस्मानाबाद, लातूर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिसा, झारखंड या भागांचा समावेश आहे. तेथून हजारो गेलेले मतदार मतदानांसाठी परतले असल्याचा अंदाज कार्यकर्त्यांनी वर्तवला. गैरहजर राहणाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई!भिवंडीच्या निवडणुकीच्या तयारीवेळी जवळपास चार हजार लोकांना प्रशिक्षण दिले होते. ते दोन टप्प्यात दिले गेले. पण बुधवारी मतदानाच्या दिवशाी जवळपास १५० कर्मचारी गैरहजर राहिले. या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या जातील.तसेच त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करण्याबाबत निवडणूक आयोगाकडे प्रस्तावही पाठविण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.