सदानंद नाईक
उल्हासनगर : आमदार कुमार आयलानी यांच्या घराच्या प्रवेशद्वारा जवळ मेलेल्या कुत्र्याचे शव टाकल्या प्रकरणी राम वाधवा व इतर साथीदारावर आमदार पुत्र धीरज आयलानी यांच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. वाधवा यांनी आमदार आयलानी निष्क्रिय असल्याचा आरोप करून मेलेल्या कुत्र्याचे शव टाकल्याचे बोलले जात आहे.
उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी निष्क्रिय असल्याने, शहरात अनेक समस्या निर्माण झाल्या,असा आरोप राम वाधवा यांनी यापूर्वी केला. तसेच गेल्या काही महिन्यांपासून आयलानी-वाधवा वाद रंगला असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत. आयलानी राहतात त्या परिसरात एका मेलेल्या कुत्र्याचे शव उचलले जात नसेलतर, असा निष्क्रिय आमदार काय कामाचा?. असा प्रश्न करून राम वाधवा व त्यांच्या साथीदारांनी आयलानी यांच्या निवासस्थानाच्या प्रवेशद्वार समोर मेलेल्या कुत्र्याचे शव ठेवले होते. अशी चर्चा शहरात आहे. याप्रकारने शहरात उलटसुलट चर्चेला ऊत आला होता. याप्रकरणी आमदार पुत्र धीरज आयलानी यांच्या तक्रारीवरून राम वाधवा यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.