शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कळवा रुग्णालय प्रशासनाचा आणखी एक भोंगळ कारभार मृत व्यक्तीचा अहवाल येण्याआधीच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2020 3:35 PM

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय प्रशासनाच्या आणखी एका चुकीमुळे पालिका आणि पोलिसांची डोकेदुखी वाढणार आहे. मृत्यु झालेल्या रुग्णाचा मृतदेह कोरोना चाचणी अहवाल येण्यापुर्वीच घरच्यांच्या स्वाधीन केल्याची धक्कादायक माहिती पुन्हा एकदा समोर आली आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचा आणखी एक भोंगळ कारभार समोर आला आहे. या रुग्णालयाने इंदिरा नगर भागातील हनुमान नगर येथील एका नागरीकाचा मृतदेह कोरोनाचा अहवाल येण्यापूर्वीच नातेवाईकांच्या स्वाधीन केला. त्यानंतर त्याच्या अंतयात्रेत अनेक नातेवाईक स्मशानभुमीत गर्दी करुन होते, गर्दी करु नका असे शासनाने सांगितले असतांनाही गर्दी झाल्याने पोलिसांनी येथील नागरीकांना मज्जाव करण्याचा प्रयत्न केला. परंतु आता मृत्यु नंतर या ५० वर्षीय नागरीकाचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाची पुन्हा एकदा झोप उडाली आहे. त्याच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्यांबरोबर अंतयात्रेत सहभागी झालेल्यांची शोध मोहीम आता सुरु झाली आहे. एकूणच एकीकडे कोरोनाला थोपविण्यासाठी शासकीय पातळीवर तसेच पोलिसांकडून दिवस रात्र प्रयत्न सुरु असातांना दुसरीकडे रुग्णालय प्रशासनाकडून अशा पध्दतीने काम केले जात असल्याने कोरोनाला थोपवयाचे कसे असा सवाल आता उपस्थित झाला आहे.                        हनुमान नगर भागातील एका व्यक्तीला हृदय विकाराचा झटका आल्याने त्याचा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु ३० एप्रिल रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. विशेष म्हणजे या कालावधीत त्याची कोरोना चाचणी देखील करण्यात आली होती. परंतु अहवाल येण्यापूर्वीच रुग्णालय प्रशासनाकडून त्याचा मृतदेह नातेवार्इंच्या स्वाधीन करण्यात आला. त्यानंतर त्याच्यावर रितसर अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानभुमीत गर्दी करु नका असे आदेश असतांनाही संबधींत मृत व्यक्तीच्या अंत्यदर्शनाला आणि अंत्यसंस्काराला अनेक जण सहभागी झाले होते. त्यामुळे पोलिसांनी येथील स्मशानभुमीतील नागरीकांना हाकलून लावले होते. दरम्यान आता मृत्यु नंतर रविवारी त्याचा कोरोनाचा अहवाल आला असून तो पॉझीटीव्ह आढळला आहे. त्यामुळे आता पालिका प्रशासनाची पूर्ती झोप उडाली आहे, रुग्णालय प्रशासनाच्या एका चुकीमुळे यापूर्वी लोकमान्य नगर भागात एका मृत झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. अवघ्या काही दिवसात येथील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ६० हून अधिक झाली आहे. त्यात आता रुग्णालय प्रशासनाच्या आणखी एका चुकीमुळे त्याचे भोग आता येथील नागरीकांबरोबर कोरोनाला थोपविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पालिका प्रशासनाबरोबर पोलिसांनाही भोगावे लागणार आहेत. त्यातही हे प्रकरण समोर येण्यापूर्वी रुग्णालय प्रशासनाकडून अशा प्रकारची आणखी एक चुक झाल्याची समोर आली आहे. नवीमुंबईतील दिघा भागातील एक व्यक्ती येथे उपचारासाठी दाखल झाली होती. परंतु तिचा मृत्यु झाला, त्यानंतर कोरोनाचा अहवाल येण्यापूर्वीच रुग्णालय प्रशासनाने मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला होता. त्यानंतर आता ही तिसरी चुक रुग्णालय प्रशासनाकडून झाली आहे. त्यामुळे याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित झाला आहे.

सदरचे प्रकरण अतिशय गंभीर असून या प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबधींतावर कारवाई झाली पाहिजे. पोलीस आणि पालिका प्रशासन कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र दुसरीकडे रुग्णालय प्रशासनाकडून अशा चुका होत असतील त्या पाठीशी घालणे अयोग्य आहे.(नरेश म्हस्के - महापौर, ठामपा) 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या