---------------------------
कोरोना चाचणी शिबिर
उल्हासनगर : महापालिका आरोग्य विभागाने संभाजी महाराज चौकात कोरोना चाचणी शिबिराचे आयोजन केले. नागरिकांनी कोरोना चाचणी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन समाजसेवक विजय कांबळे, मनिष सोळंके, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गोडसे आदींनी केली.
----------------------
रिक्षा संघटनेच्या अध्यक्षाला मारहाण
उल्हासनगर : शहाड रेल्वे स्टेशन येथे ऑटोरिक्षा चालकांना प्रवासी घेऊन जाता यावे, म्हणून रिक्षाचालक-मालक संघटनेचे अध्यक्ष नरेंद्रसिंग कलसी यांनी दुभाजक बांधले होते. याचा राग येऊन सनीब व अरुण यांनी संगनमत करून कलसी यांना रविवारी दुपारी १२ वाजता मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
------------------------
९२ हजारांची घरफोडी
उल्हासनगर : कॅम्प नं-४ परिसरात राहणाऱ्या भारती यादव आजारी आईला घेऊन डोंबिवली येथील रुग्णालयात १ मार्च रोजी गेल्या असता, अज्ञात चोरांनी त्याच्या घरातून सोन्या-चांदीचे ९२ हजार रुपयांचे दागिने लंपास केले. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
------------