ठाणे : कारवाईची धमकी देऊन अमेरिकी नागरिकांकडून खंडणी उकळणारा बोगस कॉल सेंटर प्रकरणातील मुख्य सूत्रधार सागर ठक्कर उर्फ शॅगीची बहीण रीमा हिला ठाणे पोलिसांनी अखेर गुरुवारी अटक केली. या गुन्ह्यातील कोट्यवधी रुपये तिने हवालामार्फत देशाबाहेर पाठवल्याचा आरोप आहे.कर चुकवणाऱ्या अमेरिकेतील नागरिकांशी आयआरएस (इंटर्नल रिव्हेन्यू सर्व्हिसेस) अधिकाºयांच्या नावे संपर्क साधून त्यांच्याकडून खंडणी उकळणाºया ठाण्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश पोलिसांनी आॅक्टोबर २०१६मध्ये केला होता. याबाबत ठाण्यातील काशिमीरा पोलीस ठाण्यात एक आणि नयानगर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी आतापर्यंत ७०पेक्षा जास्त आरोपींना अटक करण्यात आली असून, ३९७ आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.क्रिकेटपटू विराट कोहली याची आॅडी कार अडीच कोटी रुपयांमध्ये विकत घेणाºया शॅगीला पोलिसांनी एप्रिल २०१७ मध्ये अटक केली होती.दरम्यान, शॅगीने अटकेपूर्वीच कोट्यवधी रुपये विदेशात पाठवले असल्याची माहिती पोलिसांना त्याच्या चौकशीदरम्यान मिळाली. या व्यवहारांमध्ये त्याची बहीण रीमानेही मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला होता. तिने तीन कोटी रुपयांची विल्हेवाट हवालामार्फत लावली. हा पैसा तिने विदेशी चलन उपलब्ध करून देणाºया दिल्लीतील एका करन्सी एक्स्चेंज सेंटरकडे पाठवल्याची पोलिसांची माहिती आहे.
बोगस कॉल सेंटर प्रकरण; रीमा ठक्कर अखेर गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 4:46 AM