उल्हासनगर - रिजेन्सी अंटेलिया येथील खुल्या भूखंडाची बनावट कागदपत्रांवर बोगस सनद काढून त्याद्वारे महापालिकेकडे टीडीआर मागितल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी हेमंत हिरालाल केसवानी यांच्यासह साथीदारावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर रिजेन्सी अंटेलिया मधील गृहासंकुलात राहणारे रामचंद्र काकरांनी यांनी रिजेन्सी परीसरात सन १९९७ साली खुला भूखंड खरेदी करून, भूखंडाची सन-२००९ साली प्रांत कार्यालयाकडून सनद घेतली. काकरांनी यांच्या नावाने सनद असतांना, त्या भूखंडाचे बनावट कागदपत्र हेमन केशवानी यांने साथीदारांच्या मदतीने बनवून बोगस सनद काढली. त्याद्वारे खुला भूखंड (जमीन) आपल्या मालकीची असल्याचे भासविले. बोगस सनदेवर महापालिकेकडे अर्ज करून टीडीआर मागितल्याच्या उघड झाले. भूखंडाची मालक काकरांनी यांना याबाबतची माहिती मिळाल्यावर, त्यांनी उल्हासनगर पोलीस ठाणे गाठून सर्वप्रकारे कथन केला. पोलिसांनी हेमंन केशवानी यांच्यासह साथीदारावर गुन्हे दाखल आले असून अधिक तपास करीत आहेत. याबाबतचा तपास झालातर, मोठे मासे सापडण्याची शक्यता आहे.
संशयित आरोपी हेमंन केसवानी याने साथीदाराच्या मदतीने बनावट कागदपत्र बनवून त्यावर बोगस सनद काढली. बोगस सनदवर महापालिकेकडे टीडीआर मागितल्याचे उघड झाले. उल्हासनगर पोलिसांनी रामचंद्र काकरांनी यांच्यासह प्रांत अधिकारी कार्यालय व महापालिकेची फसवणूक केल्या प्रकरणी केसवानी यांच्यासह साथीदारावर गुन्हा दाखल केला. प्रांत कार्यालय व महापालिका नगररचनाकार विभाग ऐन दिवाळीत याप्रकारने वादात सापडला आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.