शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्रिपद, पक्षाचं प्रमुखपद की केंद्रीय राजकारण...; एकनाथ शिंदेंचं पुढचं पाऊल काय?
2
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
3
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
4
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
5
मशालीमुळे उडाला भडका, आगीचे लोळ उठले, ३० जण होरपळले  
6
देशात सर्वाधिक टोल वसुली कुठल्या राज्यात होते? २४ वर्षात सरकारने किती कमाई केली? गडकरींनी दिली माहिती
7
Stock Market Updates: शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला लाइफ इन्शुरन्स शेअर्स वधारले
8
१५० व्या कसोटीत Joe Root वर ओढावली नामुष्की! WTC मध्ये विराटपेक्षा अधिक वेळा पदरी पडला भोपळा
9
शेख हसीना चिन्मय कृष्ण दास यांच्या समर्थनात उतरल्या; तात्काळ सुटकेची मागणी केली
10
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
11
अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट
12
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद
13
१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर
14
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
15
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
16
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
17
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
18
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
19
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर

उल्हासनगरमध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट

By admin | Published: May 01, 2017 6:04 AM

शहाड फाटक येथे ओमकार आयुर्वेदिक औषधांचे दुकान आहे. दुकानातील बनावट औषध विकणाऱ्या बोगस डॉक्टरसह दुकानादारावर

उल्हासनगर : शहाड फाटक येथे ओमकार आयुर्वेदिक औषधांचे दुकान आहे. दुकानातील बनावट औषध विकणाऱ्या बोगस डॉक्टरसह दुकानादारावर उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शहरातील झोपडपट्टी विभागात बोगस डॉक्टरांची दुकाने थाटली असून पालिका दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नगरसेवक प्रमोद टाले यांनी केला.शहाड फाटक परिसरात ओमकार गिरी गोस्वामी यांचे ओमकार आयुर्वेदिक भंडाराचे दुकान आहे. दुकानात बसून डॉक्टरी करणारा मोहम्मद मसूद कादर बनावट औषधाची विक्री करीत होता. त्याच्याकडे पदवी नसल्याची पूर्ण कल्पना दुकानदार गोस्वामी याला होती. याबाबतची माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळाल्यावर शुक्रवारी रात्री छापा टाकला. कारवाईत दुकानमालक गोस्वामी व डॉक्टरकी करणारा मोहम्मद यांच्याकडे पदवी नसल्याचे उघड झाले. पोलिसांनी दोघांना अटक केली. झोपडपट्टीत बोगस डॉक्टारांचा सुळसुळाट झाला आहे. मात्र पालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजा रिजवानी यांच्यासह विभागाला जाग येत नसल्याचा आरोप टाले यांनी केला. दरम्यान, डॉ रिजवानी यांच्याशी संपर्क साधला असता बोगस डॉक्टरची माहिती मिळाल्यास कारवाई केली जाईल असे सांगितले. (प्रतिनिधी)