शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

ठाणे जिल्ह्यात बम बम भोलेचा गजर

By admin | Published: March 08, 2016 1:51 AM

महाशिवरात्रीनिमित्त खिडकाळी येथील शिवमंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. खिडकाळी मंदिरात मध्यरात्री १२ वाजल्यापासून दर्शनाला सुरूवात झाली.

डोंबिवली: महाशिवरात्रीनिमित्त खिडकाळी येथील शिवमंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. खिडकाळी मंदिरात मध्यरात्री १२ वाजल्यापासून दर्शनाला सुरूवात झाली. पहाटे पाच वाजता पूजा करून महादेवाची आरती करण्यात आली.महाशिवरात्रीनिमित्त देशात घातपात घडवण्याकरिता अतिरेकी भारतात शिरल्याची गुप्तचर यंत्रणांना खबर मिळालेली असल्याने या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महाशिवरात्रीनिमित्त एक दिवसाची जत्रा मंदिर परिसरात भरविण्यात आली होती. अनेक शिवभक्त कावड घेऊन याठिकाणी दर्शनासाठी येतात. शंकराला वाहण्यात येणाऱ्या दूध आणि बेलला आज बाजारात जास्त मागणी होती. राज्य शासनाने तीर्थक्षेत्राचा दर्जा दिलेल्या सागाव येथील पिंपळेश्वर मंदिरात सकाळी ९ वाजल्यापासून अखंड हरिनाम भजन करण्यात आले. त्यांची सांगता उद्या (८ मार्च) सकाळी ९ वाजता होणार आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने आरोग्य निदान शिबीर पार पडले. रोटरॅक्ट क्लब आॅफ डोंबिवलीतर्फे महाशिवरात्री निमित्ताने पिंडीवर वाहिलेले दूध एकत्र करून त्यावर प्रक्रिया करून गरीब आणि कुपोषित मुलांना वाटप करण्यात आले. (प्रतिनिधी)मीरा रोड : मीरा- भार्इंदरमध्ये सोमवारी महाशिवरात्र मोठ्या भक्तीभावात साजरी करण्याता आली. सुमारे २०० वर्षे पुरातन घोडबंदरच्या अमृतेश्वर मंदिरात सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सोमवारीच महाशिवरात्रीचा योग जुळून आल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह होता. भार्इंदर गावातील शंकर मंदिरात शेकडो भक्तांच्या उपस्थितीत शंकराची पूजा करण्यात आली. तारोडी येथील धरावी देवीच्या मंदिरातही उत्सवाचे वातावरण होते. सेकंडरी शाळेच्या गल्लीतील चंद्रमौसेश्वर शिव मंदिर, आरएनपी पार्क येथील काशीविश्वेश्वर शिव मंदिरात देखील दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती . ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. भिवंडी : शहर व परिसरात महाशिवरात्र उत्साहात साजरी झाली. तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने काप-कणेरी भागातील रामेश्वराची पालखीतून मिरवणूक काढली. ब्राम्हण आळी, खडबडेश्वर गोकुळनगर,रामेश्वर काप-कणेरी, नीळकंठ मंदिर येथे पहाटेपासून भक्तांनी गर्दी केली होती. पालखी जकातनाका,गोपाळनगर या भागात फिरून पुन्हा देवळात गेली. पालखी सोहळ्यास मंदिराचे प्रमुख विश्वस्त अशोककुमार फडतरे, बबनशेठ कडभाणे, पोलीस उपायुक्त सुधीर दाभाडे, नगरसेवक सुभाष माने,अरुण राऊत, प्रशांत लाड उपस्थित होते.लोनाड: महाशिवरात्री निमित्ताने भिवंडी तालुक्यातील शिरोळे गावी शिवशंभो मंदिर ट्रस्ट शिरोळे आणि परिसराच्या वतीने दोन दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाचे ह. भ. प. केशव महाराज लाप यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन केले होते. ट्रस्ट आणि ग्रामस्थ मंडळाच्यावतीने मंगळवारी ८ मार्च रोजी दुपारी ३ वाजता कुस्तीच्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. अंबरनाथ : सोमवारीच महाशिवरात्र आल्याने शिवभक्तांनी महादेवाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांग लावली होती. पाच ते सहा तास रांगेत उभे राहुन भाविकांनी महादेवाचे दर्शन घेतले. ज्या भाविकांना दर्शन घेत आले नाही त्यांनी शिवमंदिर परिसरातील जत्रेचा आनंद घेतला. ३६ तासात तीन लाखाहुन अधिक भाविकांनी अंबरनाथमध्ये उपस्थिती लावली होती. रविवारी रात्री १० वाजल्यापासुन शिवमंदिराच्या गाभाऱ्यात पुजापाठ सुरू झाला. रात्री १२ वाजता महादेवाची आरती झाल्यावर दर्शनाला सुरुवात झाली. मंदिराचे पुजारी असलेल्या पाटील कुटुंबियांनाच दर्शनाचा मान देण्यात आला. रात्रीपासुन भाविकांनी दर्शन रांगेत उभे राहुन महादेवाचे दर्शन घेतले. मंदिर परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंदिर गाभाऱ्यातही कोणताही अपघात घडू नये यासाठी दूध आणि आगरबत्ती नेण्यास बंदी घालण्यात आली. या बंदीचे पालन करण्यास भाविकांना भाग पाडण्यात आले. यंदा यात्रेमध्ये विविध खेळणी, मनोरंजनाचे प्रकार आणि पाळणे मोठ्या प्रमाणात आले होते. त्यामुळे भाविकांनीही या जत्रेचा मनमुराद आनंद घेतला. स्टेशनपासून मंदिरापर्यंत अनेक सेवाभावी संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांनी प्रसाद वाटपाची सोय केली होती. खजूर, शेंगदाणे, केळी, खिचडी असे सर्व पदार्थ भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात येत होते. दरवर्षीपेक्षा यंदा भाविकांची संख्या सर्वाधीक होती. दुसरीकडे पाणी बचतिचा संदेश देण्यासाठी मोहन पुरम मित्र मंडळाच्या वतीने राजेश नाडकर यांच्या संकल्पनेतुन ८ फूट उंच पाण्याच पाटली उभारण्यात आली होती. या पाण्याचे मोल काय आहे हा संदेश या बाटलीवर रेखाटण्यात आले होते. च्ठाणे : सोमवारी महाशिवरात्री निमित्त शहरातील वातावरण मंगलमय झाले होते. महादेवाचे दर्शन घेण्यासाठी शहरातील छोट्या मोठ्या शिवमंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता मंदिरेही रात्री उशीरापर्यंत खुली ठेवण्यात आली होती. ठाण्यातील प्राचीन कौपिनेश्वर मंदिरात दर्शसाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. शहरातील सर्वच शिवमंदिरे रोषणाईने उजळून गेली. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक देखील दर्शनासाठी मंदिरात आले होते. मंदिर परिसरात या निमित्ताने भजन, कीर्तन, प्रवचन यांसारख्या विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.