शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
3
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
4
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
5
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
6
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
7
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
8
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
9
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
10
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
11
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
12
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
13
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
14
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
15
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
16
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
17
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
19
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
20
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित

विक्रमगडमध्ये बोहाडाचा प्रारंभ

By admin | Published: March 15, 2017 1:57 AM

पालघर जिल्हातील विक्र मगड, जव्हार, मोखाडा, डहाणू या आदिवासी भागात होळी व रंगपंचमीच्या दिवसापासून ‘बोहाडा’ या आदिवासी लोककलेच्या उत्सवास सुरवात झाली आहे.

संजय नेवे , विक्रमगडपालघर जिल्हातील विक्र मगड, जव्हार, मोखाडा, डहाणू या आदिवासी भागात होळी व रंगपंचमीच्या दिवसापासून ‘बोहाडा’ या आदिवासी लोककलेच्या उत्सवास सुरवात झाली आहे.विक्र मगड तालुक्यातील कुर्झे (धगडीपाडा), वेहेलपाडा, आलोंडे, करढन, दादडे, देहेर्जे, उपराळे यासारख्या गावं पाड्यात यात्रेच्या निमित्ताने होणाऱ्या या उत्सवाच्या पहिल्या दिवशी सनई, संबळ, सूर या आदिवासीच्या विविध वाद्यातून गणपतीचा मुखवटा घातलेले सोंग काढण्यात येते. आज वीज असूनही त्याच्याबरोबर टेंभे (मशाली) घेतलेले भाविक असतात. हे सोंग रस्त्याच्या विशीष्ट मार्गाने चालत मध्यभागी सजवलेल्या वर्तुळात येते, त्या भागाला चांदणी असे म्हंटले जाते. अशा पद्धतीने गणपती सोंगानंतर सतत २ किवा ६ दिवस देवताची सोंगे काढून सांगता गावदेवी मातेच्या सोंगाने होते.या बोहाड्यात अनेक वस्तूची विक्री करण्यासाठी लांब-लांब पल्ल्याचे व्यापारी येतात. विशेषत: या उत्सवा दरम्यान विविध जाती धर्माचे लोक एकत्र येऊन आम्ही एक आहोत या गोष्टीची जाणीव करून देतात. बोहाडा सुरु होण्यापूर्वी एक मिरवणूक काढली जाते तिला आदिवासी भाषेत ‘मोहाटी’ म्हणून संबोधले जाते. या बोहाडा उत्सवातील सोंग घेणारी मंडळी ज्या दिवशी मुखवटा धारण करायचा असतो त्या दिवशी उपवास करतात. ही सोंगे परंपरेने त्या घराण्यात चालत आलेली असतात. प्रत्येक सोंगाचे वाजवण्याचे ठेके वेगवेगळे असल्याने सोंग बदलले कि ठेका बदलत असतो, अशा तऱ्हेने पहाटेपर्यत विविध प्रकारचे मुखवटे धारण केलेली सोंगे येत असतात. या पद्धतीने दिवस रात्र मजुरी करणारे येथील आदिवासी लोक आपला थकवा घालवून पारंपरीक बोहाडा उत्सव मोठ्या मौज-मज्जेने, आनंदाने साजरा करतात.