ठाणे : कोरोनाचे र्निबध शिथील झाल्यानंतर सण, उत्सव मोठय़ा जल्लोषात साजरे होत असतांनाच आता ठाण्यात दस:याच्या निमित्ताने गृह खरेदीला देखील ठाणोकरांनी पसंती दिली आहे. दस:याच्या दिवशी तब्बल ५००नवीन घरांचे बुकींग झाल्याची माहिती ठाणो एमसीएचआयच्या वतीने देण्यात आली. यात तब्बल ६०० कोटींची उलाढाल झाल्याचेही सांगण्यात आले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा गृहखरेदीत २५ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले.
मागील दोन वर्षे कोरोनाचे र्निबध होते, त्याचा फटका सर्वच घटकांना बसला होता. परंतु आता कोरोनाचे र्निबध हटल्याने सर्वच घटक उभारी घेऊ लागले आहेत. त्यातही मागील दोन वर्षे बांधकाम व्यावसायाला देखील काहीशी घरघर लागली होती. परंतु आता ती घरघर देखील आता दूर झाल्याचे दिसत आहे. यंदा दस:याच्या मुहुर्तावर नवीन घर घेणा:यांसाठी बांधकाम व्यावसायिकांकडून सवलती देखील देण्यात आल्या होत्या. यामध्ये काही रक्कम आता भर उर्वरीत रक्कम पङोशन नंतर भरा, काही ठिकाणी सोन्याची नाणी, पार्कीगवर देखील सवलत, जीएसटीची सवलत अशा काही सवलती देखील देण्यात आल्या होत्या. त्याचाच फायदा आता ग्राहकांनी देखील उचलल्याचे दिसून आले आहे.
सण उत्सवावरील र्निबध हटल्यानंतर आता दस:याला प्रथमच बांधकाम व्यावसायाने देखील मोठी ङोप यंदा घेतल्याचे दिसून आले. दस:याची दिवशी तब्बल ५०० घरांचे बुकींग झाले आहे. तर एका दिवसात तब्बल 6क्क् कोटींची उलाढाल झाल्याची माहिती एमसीएचआयचे ठाणो अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा गृहखरेदीत २५ टक्के वाढ झाल्याचेही त्यांनी सांगितले. त्यातही घोडबंदर भागाला यात अधिक पसंती ग्राहकांनी दिली. त्या खालोखाल बाळकुम, कोलशेत, माजिवडा आदींसह पोखरण रोड नं. २ आदी भागांनाही ग्राहकांनी पंसती दिली. त्यातही हे फ्लॅट ५० लाखापासून पुढे २ ते ३ करोड र्पयत उपलब्ध असल्याचेही दिसून आले. त्यामुळे सर्वसामान्यांबरोबर उच्चभ्रु श्रीमंतांनाही परवडेल अशी रेंज ठाण्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहे.आशा आहे की यंदा दस:याच्या मुहुर्तावर ग्राहकांनी जी पंसती दाखविली आहे, तशीच पसंती पुढील सणांमध्ये देखील असेल. त्यातही आता बांधकाम व्यावसायिकांसाठी राज्य शासन देखील काहीसा दिलासा देईल अशी आशा आहे. (जितेंद्र मेहता - अध्यक्ष, एमसीएचआय, ठाणे)