ठाणे : उन्हाळी हंगामात खाजगी वाहतूकदार प्रवाशांकडून अवाजवी दर आकारून प्रवासी वाहतूक करतात. या खाजगी वाहतुकीला शह देण्यासाठी ११ मे पासून बोरिवली-ठाणे-कोल्हापूर अशी स्लीपर कोच (वातानुकूलित) शिवशाही बससेवा प्रवाशांसाठी उपलब्ध होत आहे. अशा प्रकारे ठाणे विभागातून सुरू होणारी ही पहिली स्लीपर कोच सेवा ठरणार आहे. त्यामुळे आता झोपून वातानुकूलित प्रवासाचा आनंद एसटीच्या प्रवाशांना ९५५ रुपयांमध्ये घेता येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे विभागाकडून यापूर्वी ठाणे-बोरिवली, ठाणे-भार्इंदर, कोल्हापूर, शेगाव तसेच कल्याण-नगर आणि कल्याण-पुणे या शिवशाही वातानुकूलित फेऱ्या सुरू असून त्यांना नागरिकांकडून सध्या चांगला प्रतिसाद लाभत आहे. त्यातच अन्य मार्गांवरदेखील शिवशाही बससेवा सुरूकरण्याची मागणी त्यात्या परिसरातील नागरिकांकडून होत आहे. ती लक्षात घेऊन बोरिवली-ठाणे-कोल्हापूर अशी स्लीपर कोच सेवा सुरू करण्याचा निर्णय घेऊन ११ मे रोजी ती सुरू होत असून सध्या या मार्गावर दोन बस धावणार आहेत. बोरिवली आणि कोल्हापूर येथून रात्री १० वाजता ही बस सुटणार असून सकाळी ६.२० वा.च्या दरम्यान निश्चित केलेल्या ठिकाणी पोहोचणार आहेत. तसेच मोठ्यांसाठी साधारणत: ९५५ रुपये, तर लहानांसाठी ४८३ रुपये इतके प्रवासभाडे निश्चित केल्याची माहिती राज्य परिवहन ठाणे विभागाच्या विभाग नियंत्रण कक्षाने दिली.३० कोच असणारया बसमधून प्रवाशांना आरामदायी सेवा करता यावा, यासाठी बसमध्ये साधारणत: ३० कोच असणार आहेत. तसेच या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेºयाचाही वॉच असून बसमधून प्रवास करणाºयांना आॅनलाइन आणि बसमध्ये वाहकाद्वारेही तिकीट काढता येणार आहे.मुख्य जंक्शनवर बस थांबणारठाण्यातून सुरुवातीला ही बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण, ती ब्रेक लागू नये आणि आणखी एका शहरातील प्रवासी मिळावे, यासाठी बोरिवलीतून ही सेवा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातच बोरिवली, ठाणे, सातारा यासारख्या मुख्य जंक्शनवर ही बस थांबणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.स्लीपर कोच बस महत्त्वाच्या डेपोत थांबवली जाणार आहे. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा तसेच त्यांचा चांगला प्रतिसाद लाभल्यास आणखी स्लीपर कोच बसेस लांब पल्ल्यावर सुरू करण्यात येतील.’’- शैलेश चव्हाण, विभागीय नियंत्रक, ठाणे विभाग, परिवहन
शुक्रवारपासून बोरिवली-ठाणे कोल्हापूर शिवशाही सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 5:59 AM